Virat Kohli and Anushka Sharma  sakal
Cricket

Virat Kohli Anushka Sharma 2nd Baby : क्रिकेटर की फिल्म स्टार.... काही दिवसातच विराट अन् अनुष्का देणार गुड न्यूज?

Virat Kohli Anushka Sharma : उद्योगपती हर्ष गोयंका यांच्या क्रिप्टिक ट्विटनं उत्कंठा वाढली

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Anushka Sharma 2nd Baby : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे स्टार कपल काही दिवसातच आपल्या दुसऱ्या अपत्याला जन्म देण्याची शक्यता आहे. याबाबत उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक क्रिप्टिक ट्विट केले.

हर्ष गोयंका आपल्या ट्विटमध्ये (एक्स) म्हणतात की, 'एक नवीन बाळ काही दिवसात जन्माला येणार आहे. आशा आहे की हे बाळ त्याच्या वडिलांसारखं क्रिकेटचं मैदान गाजवेल किंवा आईसारखं फिल्मस्टार होईल? याचबरोबर त्यांनी जबरदस्त हॅशटॅग देखील वापरले. त्यांनी मेड इन इंडिया, टू बी बॉर्न इन लंडन असे हॅशटॅग वापरले.

उद्योगपची हर्ष गोयंका यांची ही पोस्ट लगेचच व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. एका नेटकरी हर्ष गोयंकांच्या येणारं बाळ हे क्रिकेटपटू किंवा फिल्मस्टार होणार यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, त्याच्या पालकांच्या कामगिरीचा कोणताही दबाव खांद्यावर न घेता हे बाळ साधारण व्यक्ती देखील होऊ शकतं.

दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, सर हा निर्णय त्या मुलावरच सोडा. त्याच्याशी आपलं काही घेणंदेणं नाही. मात्र होणाऱ्या बाळाच्या वडिलांकडून आम्हाला अजून मोठ-मोठे रेकॉर्ड करावे.

अजून जन्माला देखील न आलेल्या बाळावर अपेक्षांच ओझं टाकणं योग्य नाही. त्याचं आयुष्य नैसर्गिकरित्या फुलू द्या.'

विराट कोहलीने भारतात सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. पहिल्या दोन सामन्यापूर्वी तो संघासोबत सराव करत होता. मात्र पहिला सामना सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधीच त्याने पहिल्या दोन सामन्यातून माघार घेतली. त्यावेळी त्याने वैयक्तिक कारण दिलं होतं.

मात्र हे वैयक्तिक कारण काय आहे हे उघड करण्यात आलं नव्हतं. तो तिसऱ्या कसोटीत खेळेल असा अंदाज होता. मात्र उर्वरित कसोटी मालिकेसाठी संघ घोषणा होण्यापूर्वी त्याने संपूर्ण मालिकेतूनच माघार घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT