Mohammed Siraj ESAKAL
Cricket

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

India vs England 5th Test Marathi Cricket News: ओव्हल कसोटीत भारताने जबरदस्त पुनरागमन करत सामना पुन्हा आपल्या बाजूकडे वळवला आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव अक्षरशः उध्वस्त केला

Swadesh Ghanekar

  • भारताच्या २२४ धावांच्या उत्तरात इंग्लंडच्या २४७ धावा

  • मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्या प्रत्येकी ४ विकेट्स

  • यशस्वी जैस्वालने दोन जीवदानाचा फायदा उचलला अन्...

England vs India, 5th Test at London Marathi Live Cricket Score: भारतीय संघाने पाचव्या कसोटीत जबरदस्त पुनरागमन केले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी सुरुवात केलेली पाहून, टीम इंडियाचे काही खरे नाही, असेच वाटत होते. पण, मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि प्रसिद्ध कृ्ष्णा यांच्या प्रत्येकी ४ विकेट्सने इंग्लंडला फक्त २३ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. त्यानंतर यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) आपले खरे रूप दाखवताना इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडले. अर्थात त्याला दोन जीवदानही मिळाले.

भारताच्या २२४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवात तर चांगली केली होती. बेन डकेट व झॅक क्रॉली यांन ९२ धावांची सलामी दिली, परंतु भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेत इंग्लंडला मोठ्या आघाडीपासून रोखले. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात सिराज-कृष्णाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज हतबल झाले. डकेटने ४३, तर क्रॉलीने ५७ चेंडूंत ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार ऑली पोप ( २२) व जो रूट ( २९) या दोन प्रमुख फलंदाजांना सिराजने पायचीत केले. जेकब बेथेलला ( ६) बाद करून सिराजने इंग्लंडचे कंबरडे मोडले.

त्यानंतर प्रसिद्धचा तिखट मारा पाहायला मिळाला... जेमी स्मिथ ( ८), जेमी ओव्हर्टन ( ०) व गट अॅटकिन्सन ( ११) यांना बाद केले. हॅरी ब्रूक मैदानावर उभा राहिला आणि त्याने ६४ चेंडूंत ५३ धावा केल्या. सिराजने त्याचा अडथळा दूर केला अन् इंग्लंडला पहिल्या डावात २४७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. ख्रिस वोक्सने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे इंग्लंडचा संघ १० फलंदाजांसह खेळतोय. त्यामुळे नववी विकेट पडताच त्यांचा डाव संपुष्टात आला. दी ओव्हलवर एकापेक्षा जास्त वेळेस डावात ४ विकेट्स घेणारा सिराज हा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. त्याने २०२३ मध्ये WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०८ धावांत ४ बळी टिपले होते.

इंग्लंडच्या गोलंदाजांनीही विकेटसाठी जोर लावला अन् पहिल्या दोन षटकांत भारताला एकही धाव करू दिली नाही. तिसऱ्या षटकात यशस्वी जैस्वालच्या सुरेख ३ चौकारांनी संघाचे खाते उघडले. आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात यशस्वीचा तिसऱ्या स्लीपमध्ये झेल उडाला होता, परंतु चेंडूचा वेग एवढा होता की हॅरी ब्रूकला झेल पकडता आला नाही आणि चौकार मिळाला. १०व्या षटकात इंग्लंडला यश मिळाले आणि लोकेश २८ चेंडूंत ७ धावा करून स्लीपमध्ये झेल देऊन परतला. भारताला ४६ धावांवर पहिला धक्का बसला. राहुलने या मालिकेत १० डावांत ५३ च्या सरासीरने ५३२ धावा केल्या. यात दोन शतकं व दोन अर्धशतकं आहेत.

कसोटी मालिकेत सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे भारतीय सलामीवीर

  • १३८२ - सुनील गावस्कर वि. इंग्लंड, १९८१

  • ११९९ - सुनील गावस्कर वि. इंग्लंड, १९७९

  • ११०५ - सुनील गावस्कर वि. पाकिस्तान, १९७९

  • १०६६ - लोकेश राहुल वि. इंग्लंड, २०२५

  • १०५४ - मुरली विजय वि. इंग्लंड, २०१४

  • १०३२- सुनील गावस्कर वि. ऑस्ट्रेलिया, १९७७

१३व्या षटकात जैस्वालला ( ४०) आणखी एक जीवदान मिळाले, लिएम डॉसनने सोपा झेल टाकला आणि ही चूक इंग्लंडला महागात पडताना दिसतेय. त्याने षटकार खेचून ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या गस अॅटकिन्सनने भारताला दुसरा धक्का देताना साई सुदर्शनला ( ११) पायचीत केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताच्या २ बाद ७५ धावा झाल्या होत्या आणि त्यांच्याकडे ५२ धावांची आघाडी आहे. यशस्वी जैस्वाल ५१ धावांवर नाबाद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

Murlidhar Mohol : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

RRC Recruitment 2025: आनंदाची बातमी! रेल्वेमध्ये 10वी पाससाठी 3115 नवीन भरती जाहीर; सविस्तर माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT