IND vs SL 3rd T20I Playing XI sakal
Cricket

IND vs SL 3rd T20I : शेवटच्या टी-20 सामन्यात कर्णधार सूर्या संघात 1,2 नाही तर करणार इतके बदल? जाणून घ्या प्लेइंग-11

India vs Sri Lanka 3rd T20I : पल्लेकेले येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना मंगळवार 30 जुलै म्हणजे आज खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 3rd T20I Indian Playing XI : पल्लेकेले येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना मंगळवार 30 जुलै म्हणजे आज खेळला जाणार आहे. मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने या सामन्याचे महत्त्व विशेष नाही, कारण टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बद्दल बरीच चर्चा होत आहे.

तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक-दोन नव्हे तर चार बदल पाहायला मिळू शकतात. मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या टी-20 मध्ये आपली बेंच स्ट्रेंथ टेस्ट करू शकतो.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल पाहायला मिळू शकतात. संघात पहिला बदल संजू सॅमसनच्या रूपाने पाहायला मिळतो. दुसऱ्या टी-20 मध्ये शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. आता तिसऱ्या टी-20 मध्ये शुभमन गिल पुनरागमन करू शकतो. दुसऱ्या टी-20मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणाऱ्या संजूला संधीचा फायदा घेता आला नाही आणि तो 'गोल्डन डक'वर बाद झाला.

याशिवाय दुसरा बदल वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या रूपात होऊ शकतो. मोहम्मद सिराजच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमचा संघात समावेश केला जाऊ शकतो. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये सिराजला केवळ एकच विकेट घेता आली आहे.

अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या हे पहिल्या दोन टी-20 मध्ये खेळले होते. अशा परिस्थितीत दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना तिसऱ्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. हार्दिक पंड्याच्या जागी शिवम दुबेला संधी मिळू शकते आणि अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, खलील अहमद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT