India First Ever Hybrid Pitch Revealed In Dharamshala Hpca Stadium News Marathi sakal
Cricket

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

India First Ever Hybrid Pitch Revealed In Dharamshala : देशातील पहिल्या वहिल्या हायब्रिड खेळपट्टीचे आज हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या नयनरम्य स्टेडियममध्ये एका शानदार कार्यक्रमाद्वारे अनावरण करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

India First Ever Hybrid Pitch Revealed In Dharamshala : देशातील पहिल्या वहिल्या हायब्रिड खेळपट्टीचे आज हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या नयनरम्य स्टेडियममध्ये एका शानदार कार्यक्रमाद्वारे अनावरण करण्यात आले. असा प्रयोग लवकरच मुंबई आणि अहमदाबादमध्येही करण्यात येणार आहे.

या हायब्रिड खेळपट्टी अनावरणाच्या कार्यक्रमास आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मान्यवरांमध्ये पॉल टेलर यांचा समावेश होता. पॉल हे इंग्लंडचे माजी खेळाडू तसेच एसआयएस आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक आहेत.

हायब्रिड खेळपट्ट्यांचा प्रयोग आता भारतात क्रांती घडवू शकेल, अशा खेळपट्ट्या क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्‌स आणि ओव्हल येथेही वसवण्यात आल्या आहेत, असे धुमल यांनी सांगितले. धुमल हे हिमाचल प्रदेश क्रिकेटचे पदाधिकारीही आहेत.

हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय?

हायब्रिड खेळपट्टी म्हणजे नैसर्गिक गवत आणि कृत्रिम गवत यांच्या मिश्रणातून तयार केली जाते. अशा खेळपट्ट्या खराब होत नाहीत. त्यांचा टिकाऊपणा अधिक असतो. सातत्यपूर्ण खेळ होण्याचीही क्षमता अधिक असते. त्यामुळे दर्जेदार खेळपट्टी तयार करण्यासाठी आणि तिचे संगोपन करण्यासाठी ग्राऊंड स्टाफची मेहनत फारच कमी होते. नैसर्गिक आणि कृत्रिम गवताचा वापर केला जात असला तरी कृत्रिम गवत हे केवळ पाच टक्के असते, त्यामुळे खेळपट्टीचा आत्मा असलेला नैसर्गिकपणा कायम राहतो. (What is a hybrid pitch?)

हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेने पुढाकार घेऊन हे महत्त्वाचे पाऊल उचलले, त्याबद्दल टेलर यांनी त्यांचे आभार मानले. आयसीसीच्या मान्यतेने हा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचा कसा सकारात्मक परिणाम होतो, याची आम्हाला उत्सुकता आहे. यानंतर मुंबई आणि अहमदाबादमध्येही अशा खेळपट्ट्या तयार करण्यात येणार असल्याचे टेलर यांनी सांगितले.

अशा खेळपट्ट्या वसवण्यात ‘युनिव्हर्सल मशीन’चा वाटा अधिक मोलाचा असतो. ‘एसआयएस ग्रास’ या कंपनीने २०१७ मध्ये अशी खेळपट्टी तयार केली. त्यानंतर इंग्लिश कौंटी क्रिकेट मैदानावर अशा खेळपट्ट्या वसवण्यात आल्या.

ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी अशा खेळपट्ट्यांचा वापर करण्यास आयसीसीने हिरवा कंदील दाखवलेला आहे. आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या चार दिवसांच्या कौंटी क्रिकेट स्पर्धेसाठी अशा खेळपट्ट्यांचा वापर केला जाणार आहे.

नैसर्गिक गवताच्या मुळांना नैसर्गिक हवा मिळण्याचे तंत्रज्ञान यात विकसित करण्यात आले आहे, त्यामुळे खेळपट्टीची क्षमता आणि प्रतिकारशक्ती अधिक चांगला आणि सुरक्षित खेळ होण्यासाठी होणार असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT