India vs Pakistan T20 World Cup 2024 ticket prices all details sakal
Cricket

T20 WC 2024 IND Vs PAK : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची जबरदस्त क्रेझ, १ तिकीट इतक्या लाखांना...

भारतात आयपीएलचा धुमधडाका सुरू असताना महिनापेक्षा कमी दिवस असलेल्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे वेध क्रिकेट विश्वाला लागले आहे. त्यातच भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याच्या तिकीट किमतीने कधी नव्हे एवढा उच्चांक गाठला आहे.

Kiran Mahanavar

India vs Pakistan T20 World Cup 2024 Ticket Prices : भारतात आयपीएलचा धुमधडाका सुरू असताना महिनापेक्षा कमी दिवस असलेल्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे वेध क्रिकेट विश्वाला लागले आहे. त्यातच भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याच्या तिकीट किमतीने कधी नव्हे एवढा उच्चांक गाठला आहे.

कोणत्याही विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यापेक्षा भारत-पाक लढतीला अधिक प्राधान्य मिळत असते. ही विश्वकरंडक स्पर्धा विंडीज आणि अमेरिकेत होणार आहे. त्यातील भारत-पाक सामना ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये नियोजित आहेत.

अमेरिकेत प्रथमच भारत-पाक सामना होणार असल्यामुळे एका तिकिटाची किंमत २.८ लाखांपर्यंत गेल्याचे समजते. एका प्रसिद्ध वर्तमानपत्रातील वृत्तानुसार सुरुवातीला या सामन्यातील एका तिकिटासाठी १,३०० डॉलर इतकी किंमत होती, आता हीच रक्कम २,५०० डॉलर इतकी झाली आहे.

या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक सामना न्यूयॉर्कमधील नासू कौंटी स्टेडियममध्ये होणार आहे. या स्टेडियमसह मैदानाचीही नव्याने उभारणी केली जात आहे. जेमतेम ३४ हजार प्रेक्षक संख्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक सामना सव्वालाख प्रेक्षकसंख्या असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झला होता. १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यासाठी तिकिटांचे भाव गगनाला भिडले होते. एवढेच नव्हे तर अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किमतीही भरमसाठ वाढल्या होत्या. आता न्यूयॉर्कमध्येही हीच स्थिती असणार आहे.

एकीकडे भारत-पाक सामन्यांच्या तिकिटांची किंमत कमालीची वाढत असताना अजून पाकचा संघ जाहीर झालेला नाही. बहुतेक खेळाडूंसमोर तंदुरुस्तीचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी संघ जाहीर करणे टाळले आहे. भारताने मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपला संघ जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT