Cricket

Mohammed Shami Injury Update : लंडनमधील उपचारानंतर.... बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या दुखापतीवर दिली मोठी अपडेट

Mohammed Shami BCCI : बीसीसीआयने इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीसाठी आपल्या संघात काही बदल केले. हे बदल सांगत असतानाच मोहम्मद शमीच्या दुखापतीवर देखील अपडेट दिली.

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami Injury Update : बीसीसीआयने नुकतेच इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल असल्याचे घोषित केले. केएल राहुल हा दुखापतीतून सावरलेला नाही त्यामुळे तो पाचव्या कसोटीला देखील मुकणार आहे. तर चौथ्या कसोटीत विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराह संघात परतला आहे. त्यामुळे भारताची गोलंदाज मजबूत झाली आहे.

दरम्यान, बीसीसीआयने यावेळी भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत देखील अपडेट दिली. काही दिवसांपूर्वीच मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले होते.

बीसीसीआयने 7 मार्चपासून सुरू होणाऱ्या धरमशाला कसोटीसाठी भारतीय संघ घोषित केला. यावेळी मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत देखील अधिकृतरित्या माहिती देण्यात आली.

बीसीसीआय म्हणते की, 'मोहम्मद शमीवर 26 फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. तो उजव्या पायाच्या टाचेच्या दुखापतीने हैराण होता. तो सध्या चांगल्या प्रकारे रिकव्हर होत आहे. तो लवकरच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल. तेथे तो रिहॅबिलिटेशन प्रक्रिया सुरू करेल.'

मोहम्मद शमीला ही दुखापत वनडे वर्ल्डकप 2023 दरम्यान झाली होती. त्यावेळी त्याला मैदानावर उभं राहण्यासाठी सातत्याने इंजेक्शन्स घ्यावी लागत होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT