new zealand vs australia Marathi News sakal
Cricket

कसोटी सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर, बदलीची घोषणा! 'या' स्टारला मिळाली संधी

New Zealand vs Australia Test News : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे....

Kiran Mahanavar

New Zealand vs Australia Test : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 172 धावांनी पराभव केला होता. या पराभवासह न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत एक स्थान गमावले आहे.

WTC गुणतालिकेत संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना 8 मार्च रोजी खेळला जाणार आहे. मात्र याआधीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडचा विल्यम ओ'रुर्क दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला दूखापत झाली, त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. स्कॅन केल्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याला दूखापत दिसली. आता त्याला किमान दोन आठवड्यांच्या विश्रांतीची गरज आहे. त्याच्या जागी बेन सियर्सचा संघात समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सोमवारी पुष्टी केली की, विल्यम ओ'रुर्के दुखापतीमुळे दुस-या कसोटीतून बाहेर पडला आहे. बेन सियर्स क्राइस्टचर्चमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. विलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने किवी संघासाठी 2 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

प्रशिक्षक स्टेड म्हणाले की, त्याला यापूर्वी कधीही हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली नव्हती. विलसाठी हे खूपच निराशाजनक आहे. त्याने शानदार गोलंदाजी केली आहे. दुखापतीपूर्वीचा त्याचा स्पेल उत्कृष्ट होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत बेन सियर्सने दमदार कामगिरी केली होती. त्याने 13 टी-20 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय फर्स्ट क्लासमध्ये 27.03 च्या सरासरीने त्याच्या नावावर 58 विकेट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT