Ind Vs Eng 4th Ranchi Test Marathi News sakal
Cricket

Ind vs Eng 3rd Test : कशी असणार चौथ्या कसोटीची खेळपट्टी? इंग्लंडच्या हुकमी फलंदाजाने बांधला रोहितच्या स्ट्रॅटजीचा अंदाज

Ind vs Eng 3rd Test News : जसप्रीत बुमराला विश्रांती दिल्यामुळे मोठी मदार आता फिरकी गोलंदाजांवर असणार आहे परिणामी....

Kiran Mahanavar

India vs England Ranchi Test : जसप्रीत बुमराला विश्रांती दिल्यामुळे मोठी मदार आता फिरकी गोलंदाजांवर असणार आहे. परिणामी, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात रांचीत पूर्णतः फिरकीस साथ देणारी खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा हुकमी फलंदाज ऑली पोप यानेही असाच अंदाज बांधला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाचही कसोटी सामन्यांच्या जागा अशा आहेत, जिथे लाल मातीची खेळपट्टी दिसत नाही. मुंबई किंवा चेन्नईला असते तो रंग या पाच सेंटरवरील खेळपट्ट्यांचा दिसत नाही. अर्थातच त्यामुळे ज्याला खरी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी म्हटले जाते तशी मिळणे कठीण होते, कारण या सर्व जागांवरील खेळपट्ट्या प्रामुख्याने काळ्या मातीच्या आहेत. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरा रांचीला खेळणार नसल्याने संघ व्यवस्थापनाने स्थानिक संघटनेशी बोलून फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

रांचीच्या खेळपट्टीवरील माती काळी असल्याने त्यावर कमी रोलिंग आणि कमी पाणी मारून ती टणक होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. सामन्याच्या दोन दिवस अगोदर मैदानावर दोनही संघांचा सराव बघायला ‘सकाळ’चा वार्ताहर गेला असताना एकदाही माळी पाणी करताना किंवा रोलिंग करताना दिसले नाहीत. अगदी माफक गवताची झाक खेळपट्टीवर दिसत असली तरी तीसुद्धा सामन्याच्या अगोदर काढून टाकली जाईल, असेच कानावर आले आहे.

इंग्लंड संघाचा फलंदाज ऑली पोपने रांची कसोटी सामन्यासाठी तयार करत असलेल्या विकेटवर भाष्य करताना खेळपट्टी अगोदरच्या दोन कसोटी सामन्यांपेक्षा वेगळी असल्याचे सांगितले. रांचीच्या खेळपट्टीवर जास्त तडे असतील तसेच एका बाजूला खेळपट्टी जरा जास्त कोरडी वाटत असल्याचा अंदाज वर्तवला.

भारतीय फिरकी गोलंदाजांना फिरकीला मदत करणार्‍या खेळपट्टीवर खेळणे सोपे नसते. आमची चांगली परीक्षा बघितली जात आहे. आम्ही भारतीय गोलंदाजांना प्रत्युत्तर द्यायला आक्रमक खेळ तर करणारच वर पाठ्यपुस्तकातील सोडून फटकेही मारणार, ओली पोप सांगून गेला.

पहिल्या दिवसापासून चेंडू वळणार?

इंग्लंडच्या बॅझबॉल विचार प्रणालीला धक्का द्यायचा झाल्यास त्यांच्या फलंदाजांच्या मनात फिरकीचे भय निर्माण करणे हाच एक चांगला उपाय दिसतो आहे. तिसर्‍या कसोटीच्या दुसऱ्या डावात राजकोटची खेळपट्टी थोडी फिरकीला साथ द्यायला लागली तरी इंग्लिश फलंदाजांची रवींद्र जडेजाला खेळताना भंबेरी उडाली. रांचीच्या सामन्यात अशीच शक्यता दाट वाटत आहे की खेळपट्टीवर अगदी पहिल्या दिवशीपासून चेंडू वळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT