Tanush Kotian esakal
Cricket

Ranji Trophy 2024 : हार्दिकसारखी बॅटिंग अश्विनसारखी बॉलिंग तरी हा मुंबईकर आयपीएल लिलावात का राहिला अनसोल्ड?

Ranji Trophy Tanush Kotian : दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठी खेळी करण्यात कोटियनचा हातखंडा दिसतोय.

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy 2024 Tanush Kotian : भारतीय संघाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यंदा ३८ वर्षांचा होणार आहे. त्याने अलीकडेच कसोटीत 500 बळी पूर्ण केले आहेत. पण अश्विन आता जास्त काळ खेळू शकणार नाही. त्याचा बदली खेळाडू अद्याप भारतीय संघात दिसत नाही. पण रणजी ट्रॉफीमध्ये एका खेळाडूने ही जागा भरून काढण्याची गुणवत्ता आपल्यात असल्याचं दाखवून दिलं आहे. मुंबईच्या तनुष कोटियनने २५ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने रणजी ट्रॉफीच्या या मोसमात अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली आहे.

तनुष कोटियन अश्विनप्रमाणेच ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या फलंदाजीचीच जास्त चर्चा आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले. तमिळनाडूविरूद्ध उपांत्य फेरीत पुन्हा एकदा दहाव्या क्रमांकावर खेळताना त्याने नाबाद ८९ धावा केल्या. या मोसमात त्याने 9 सामन्यांत 48 च्या सरासरीने 481 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

यंदाच्या रणजी हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा

  • भूपेन लालवानी- 533 धावा

  • तनुष कोटियन- 481 धावा

  • शिवम दुबे- 405 धावा

तनुष कोटियन ऑफ स्पिन गोलंदाजीतही मुंबईसाठी दमदार कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यात 22 फलंदाजांना बाद केले आहे. युपीविरुद्धच्या सामन्यातही त्याने एका डावातही ५ बळी घेतले होते. धावा करण्याच्या बाबतीत तो मुंबईसाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि विकेट घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

यंदाच्या रणजी हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स

  • मोहित अवस्थी- 35 विकेट्स

  • शम्स मुलानी- 31 विकेट्स

  • तनुष कोटियन- 22 विकेट्स

संशयास्पद अॅक्शनमुळे लिलावात अनसोल्ड

आयपीएल 2024 च्या लिलावाच्या दिवशीच तनुष कोटियनची बॉलिंग ॲक्शन संशयास्पद घोषित करण्यात आली होती. यामुळे तो न विकला गेला. मात्र, यातून सावरल्यानंतर त्याने रणजी स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 25 सामन्यांमध्ये 45 पेक्षा जास्त सरासरीने 1131 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत जवळपास 28 च्या सरासरीने 68 बळी घेतले आहेत.

(Latest Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT