Rinku Singh in Dharamshala Marathi News sakal
Cricket

Rinku Singh: टीम इंडियासोबत रिंकू देखील पोहचला धरमशालामध्ये, खेळणार पहिली कसोटी? समोर आले मोठे कारण

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जाणार आहे. सामन्याच्या दोन दिवस आधी टीम इंडियाचा युवा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगही धरशालाला पोहोचला आहे.

Kiran Mahanavar

India Vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जाणार आहे. सामन्याच्या दोन दिवस आधी टीम इंडियाचा युवा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगही धरशालाला पोहोचला आहे.

यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात रिंकू सिंग कसोटी पदार्पण करणार का? तुम्हाला सांगतो, रिंकू सिंगने टीम इंडियासाठी वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये याआधी डेब्यू केले आहे, पण त्याने अजून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.

रिंकू सिंगचा पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या संघात समावेश नाही, त्यामुळे शेवटच्या कसोटी सामन्यात पदार्पण करणे त्याच्यासाठी शक्य नाही. रिंकू सिंग धरमशालामध्ये मॅच पाहण्यासाठी आला असावा. पण, रिंकू सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना धरमशालामध्ये येण्याची माहिती दिली आहे.

खरंतर, धर्मशाला पोहोचल्यानंतर रिंकू सिंगने माजी स्फोटक फलंदाज आणि त्याच्या आयपीएल टीम केकेआरचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलमची भेट घेतली. रिंकू सिंगला ब्रेंडन मॅक्क्युलमकडून खूप काही शिकायला मिळाले आहे.

मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आणि सलग तीन सामने जिंकून मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता शेवटचा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका 4-1 ने जिंकायची आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसू शकतात. पाचव्या कसोटी सामन्यात आणखी एक खेळाडू टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो.

होय देवदत्त पडिक्कल धरमशाला कसोटीत पदार्पण करू शकतो. रजत पाटीदारच्या जागी देवदत्तचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. रजत पाटीदारलाही या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती, पण रजत या संधीचे सोने करू शकला नाही. त्यानंतर त्याला संघातून वगळण्याचा धोका आहे.

धरमशाला येथील पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT