Rohit Sharma and Ajit Agarkar did not want to select Hardik Pandya sakal
Cricket

T20 World Cup 2024 : कर्णधार रोहित अन् आगरकरला हार्दिक पांड्या संघात नको होता; मग तरी कशी झाली निवड?

Team India Squad for T20 World Cup 2024 : आयपीएल आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आणि मुंबई इंडियन्स सोबत तीन संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर गेले.

Kiran Mahanavar

Team India Squad for T20 World Cup 2024 : आयपीएल आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आणि मुंबई इंडियन्स सोबत तीन संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर गेले. आता या संघांचे खेळाडू आयपीएल सोडून राष्ट्रीय संघांवर लक्ष केंद्रित करतील, कारण त्यांना जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.

कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील अनेक खेळाडू 24 मे रोजी सह-यजमान अमेरिकेला जाणार आहेत. मात्र त्याआधी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याबाबत बातम्या येत आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.

टी-20 वर्ल्ड कप जवळ आला आहे पण भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांच्यातील वाद थांबत नाही; आता रोहित-हार्दिकच्या खराब केमिस्ट्रीचा भारताच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती आहे. 2013 पासून भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

दरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात हार्दिक पांड्याची निवड करण्याच्या बाजूने नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, अहमदाबादमध्ये निवड समितीची बैठक झाली तेव्हा मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहितसह अनेक निवडकही हार्दिक पांड्याला संघात घेण्याच्या बाजूने नव्हते. मात्र, दबावामुळे हार्दिक पांड्याची संघात निवड करण्यात आली आणि त्याला उपकर्णधारही करण्यात आले.

भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपला आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. अमेरिका आणि कॅनडाचे संघही भारताच्या गटात आहेत. भारतीय संघ 12 जूनला अमेरिकेशी आणि 15 जूनला कॅनडाचा सामना करेल.

भारतीय खेळाडू दोन बॅचमध्ये टी-20 वर्ल्डकपसाठी रवाना होतील. ज्या खेळाडूंचे संघ आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर पडतील ते 24 मे रोजी पहिल्या बॅचमध्ये अमेरिकेला जातील. टीम इंडियामध्ये समाविष्ट असलेले उर्वरित खेळाडू आयपीएल फायनलनंतर अमेरिकेला रवाना होतील. 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT