Sourav Ganguly
Sourav Ganguly  esakal
क्रिकेट

Sourav Ganguly Rohit Sharma : रोहित शर्माला कर्णधार केलं कारण... सौरव गांगुली भारतीय कर्णधाराबद्दल काय बोलला?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Captaincy Sourav Ganguly Statement : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने भारताचा कर्णधार रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केलं. भारतीय संघाने वनडे वर्ल्डकपमध्ये आणि इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत देखील दमदार कामगिरी केली.

त्यानंतर सौरव गांगुलीने रोहित शर्माला कर्णधार करण्यामागचं कारण सांगितलं. गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असतानाच रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आले होते.

रोहित शर्माकडे डिसेंबर 2021 मध्ये भारतीय वनडे आणि टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर महिनाभरातच त्याच्याकडे कसोटी संघाचे देखील कर्णधारपद सोपवण्यात आलं.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये पोहचला होता. याचबरोबर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये देखील पोहचला होता. गेल्या वर्षी भारतीय संघ आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये देखील पोहचला. भारताचे विजेतेपद थोडक्यात हुकले.

दरम्यान, सौरव गांगुलीने रेव स्पोर्ट्सशी रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल कौतुकाचे उद्गार काढले. तो म्हणाला, 'रोहित शर्मा हा एक जबरदस्त कर्णधार आहे. त्याने वर्ल्डकपमध्ये कशा प्रकारे नेतृत्व केलं हे आपण पाहिलं आहे. मला वाटतं की भारतीय संघ फायनल हरण्यापूर्वी स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता.

रोहित एक चांगला कर्णधार आहे. त्याच्या नावावर अनेक आयपीएल टायटल आहे. त्याने ज्या प्रकारे कॅप्टन्सी केली त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. मी अध्यक्ष होतो त्यावेळी तो कर्णधार झाला होता. आम्ही त्याला कर्णधार केलं कारण त्याच्यात ती क्षमता होती आणि त्याने जे काही केलं ते पाहून मला तरी आश्चर्य वाटलं नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडविरूद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. ही मालिका भारताने प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत देखील 3-1 अशी जिंकली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना हा धरमशाला येथे खेळला जाणार आहे. इंग्लंड भारतात येण्यापूर्वी बॅझबॉलची मोठी चर्चा होती. मात्र रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर बॅझबॉलने सपशेल शरणागती पत्करली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT