Sachin Ramesh Tendulkar esakal
Cricket

Sachin Tendulkar : बाबा मला कायम चांगल्या मूडमध्ये ठेवायचे.... आठवणीत रमलेल्या सचिनने पुढच्या पिढीला दिला मोलाचा सल्ला

Sachin Tendulkar : सचिन बाबांच्या आठवणीत रमला, संघर्षांच्या काळातील स्मृतींना दिला उजाळा

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Ramesh Tendulkar : सचिन तेंडुलकरचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या 25 व्या स्मृतीदिनी मराठी संशोधन पत्रिका प्रा. रमेश तेंडुलकर विशेषाकांचे प्रकाशन आज दादरच्या शारदा मंगल कार्यालयात झाले. यावेळी डिंपल पब्लिकेशन प्रकाशित रमेश तेंडुलकर आणि नितीन तेंडुलकर यांच्या पुस्तकांचे देखील प्रकाशन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद हे शरद पवार यांनी भुषवलं. तर प्रमुख पाहुणा म्हणून सचिन तेंडुलकरला आमंत्रित केलं होतं. यावेळी सचिन तेंडुलकरने आपल्या बाबांच्या आठवणींना उजाळा दिला.

सचिन तेंडुलकर त्यांच्या बाबांच्या संघर्षाच्या काळाबद्दल बोलताना म्हणाला की, 'बाबांचे लाहणपण हे अलिबाग येथे गेले. त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. त्यांना शाळेत जाण्यासाठी 8 ते 10 किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. मात्र बाबांनी कधीही या आव्हानांची झळ आमच्यापर्यंत पोहचू दिली नाही. बाबांना वाचण्याची आणि शिकण्याची प्रचंड आवड होती.

सचिन तेंडलुकर बाबांसोबतचा मुंबईत येण्याचा प्रवास कसा होता याबद्दल देखील बोलला. तो म्हणला की, 'ज्यावेळी बाबा मुंबईत आले त्यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब देखील दादरला आले होते. आमच्याकडे दोनच रूम होत्या त्यात एका कोपऱ्यात बाबा वाचन करत असायचे. घरात खूप आवाज होत होता. मात्र तरीही त्यांनी बीए आणि एमएमध्ये गोल्ड मेडल मिळवलं.

कालांतरानं आम्ही गाडी घेतली. मी बांद्रावरून वानेखेडेला प्रॅक्टिस करण्यासाठी जात होतो. त्यावेळी आम्ही बाबांना किर्ती कॉलेजला सोडायला जायचो. गाडीत मी म्युझिक लावलेलं असायचं अन् बाबा पुस्तक वाचायचे. पुढं क्रिकेट खेळण्यासाठी मी काकांकडे रहायला गेलो. शिवाजी पार्कला आई बाबा मला भेटायला यायचे. त्यावेळी ते बसने यायचे.

सचिन बाबांच्या आठवणीत रमला असताना त्याला आजच्या पिढीला तू काय सल्ला देशील असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सचिनने सांगितले की, मला घरातून 100 टक्के पाठिंबा होता. घरात चांगलं वातावरण निर्माण करणं महत्वांच आहे. मी बाबांचा आनुभव गेतला आहे. ते केव्हाही चिडले नाहीत. ते मला कायम चांगल्या मूडमध्येच ठेवायचे. मी पालकांना सांगू इच्छितो की आपल्या पाल्याला ज्याची आवड आहे तेच करू द्या. त्याची आवड तुम्ही समजून घ्या.

मात्र मुलांनीही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यावर जबाबदारी आहे. तुमचा प्रवास हा जुमच्या ह्रदयातून होऊ द्या. तुम्ही जे करणार आहात ते पूर्ण मन लावून करा.'

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

"ते जुने गाऊन मी सिनेमात वापरले" भार्गवीने सांगितला वन रूम किचन सिनेमाचा खास किस्सा

SCROLL FOR NEXT