Virat Kohli esakal
Cricket

IND vs ENG Virat Kohli : ज्यावेळी मैदानावर शांतता पसरते... समालोचक मांजरेकरांना अचानक का आठवला विराट कोहली?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG India Missing Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची अवस्था बिकट झाली होती. मात्र जो रूट आणि ओली पोप यांनी 102 धावांची भागीदारी रचली. यामुळे भारतीय संघात शांतता पसरली होती. रूटने नाबाद 122 धावा केल्या तर पोपने 58 धावांची खेळी केली.

दरम्यान, भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी रूट - पोप भागीदारी फुलत असताना मैदानावर निर्माण झालेल्या शांततेचा मुद्दा पकडून विराट कोहलीची आठवण काढली. मांजरेकरांच्या मते भारतीय संघ नक्कीच विराट कोहलीला मिस करत होता.

याचबरोबर भारतीय संघाने पहिल्या डावात त्यावेळी 91 धावात सहा विकेट्स गमावल्या अन् शोएब बशीर भारतीय फलंदाजांच्या डोक्यावर बसला होता ते पाहून देखील विराट कोहलीची सर्वांना आठवण झाली होती.

संजय मांजरेकर समालोचन करताना म्हणाले की, 'विराट कोहली हा एक असा व्यक्ती आहे जो मैदानावर ज्यावेळी शांतता पसरते त्यावेळी तो प्रेक्षकांना खेळाडूंमध्ये जोश भरण्यासाठी उद्युक्त करतो. ज्यावेळी विराट कोहली मैदानावर येतो त्यावेळी जोश हा वरच्या टिपेला पोहचलेला असतो. भारतीय संघाला नक्कीच त्याची उणीव भासत असणार. तो संघात जोश भरत होता.'

विराट कोहलीचा आरसीबीमधील संघसहकारी दिनेश कार्तिकने देखील याचे समर्थन केलं. तो म्हणाला की, 'विराटकडे प्रेक्षकांना आपल्या बाजूने करून घेण्याची अंगभूत क्षमता आहे.'

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव 353 धावात गुंडाळला. जो रूटने नाबाद 122 धावा केल्या. तर जडेजाने 4 विकेट्स घेतल्या. याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघांची पहिल्या डावात पडझड झाली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 7 बाद 219 धावा झाल्या होत्या. त्यात यशस्वी जैस्वालच्या 73 धावांचा मोठा वाटा होता. तर शुभमन गिलने 38 धावांची खेळी केली. भारताची अवस्था 7 बाद 177 धावा अशी झाली असताना ध्रुव जुरेल (नाबाद 30) आणि कुलदीप यादव (नाबाद 17) यांनी 42 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT