Rohit Sharma  esakal
Cricket

IND vs ENG : भारताचा सलग 17 वा मालिका विजय; शुभमन गिलने घातला पाया ध्रुव जुरेलने चढवला कळस

India Vs England 4th Test : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धची मालिका जिंकून मोठी कामगिरी केली.

अनिरुद्ध संकपाळ

India Won 4th Test Shubman Gill Dhruv Jurel Shine : भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडचा 5 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 3 -1 अशी आघाडी घेतली. भारताचा हा मायदेशातला सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. चौथ्या कसोटीत आर. अश्विन, आकाश दीप, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी दमदार कामगिरी केली.

इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 307 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडला 145 धावात गुंडाळले. विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाल्यावर हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत सामना आणि मालिका खिशात टाकली.

भारताने हैदारबादचा कसोटी सामना 28 धावांनी गमावल्यानंतर सर्व चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्यात विराट कोहलीने संपूर्ण कसोटी मालिकेतून माघार घेतली. पाठोपाठ केएल राहुल दुखापतग्रस्त झाला. पुढं उपकर्णधार जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली.

संघात नवख्या खेळाडूंचा भरणा होता. तरी देखील रोहितने संघाचे नेतृत्व यशस्वीरित्या करत इंग्लंडचा बॅझबॉल मोडून खाल्ला. भारताने चौथ्या कसोटीत नाणेफेक गमावून देखील सामना जिंकून दाखवला.

या सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. संधीचं सोनं कसं करावं हे यशस्वी, सर्फराज , शुभमन गिल, ध्रुव जुरेल आणि आकाश दीपकडून शिकावंं!

भारताने चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बिनबाद 40 धावांपासून सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्माने ही भागीदारी 84 धावांपर्यंत पोहचवली. रोहित अर्धशतक ठोकले. मात्र 37 धावांवर रूटने यशस्वीला बाद केलं.

त्यानंतर भारताची गळती सुरू झाली. रोहित शर्मा 55 धावा करून बाद झाला अन् त्यानंतर आलेला रजत पाटीदार शुन्य धावांची भर घालून परतला. भारताची अवस्था 3 बाद 100 धावा अशी झाली असताना शुभमन गिल आणि रविंद्र जडेजाने 20 धावांची भागीदारी रचली.

मात्र लंचनंतर इंग्लंडने पुन्हा भारताला दोन धक्के दिले. बशीरने जडेजाला 4 धावांवर तर सर्फराज खानला शुन्यावर बाद करत भारताची अवस्था 5 बाद 120 धावा अशी केली.

सर्फराज बाद झाल्यानंतर आलेल्या ध्रुव जुरेलने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याने शुभमन गिलसोबत सर्वात महत्वाची भागीदारी रचली. या दोघांनी एकेरी आणि दुहेरीवर भर देत इंग्लंडच्या गोलंदाजांना आपली विकेट दिली नाही.

या दोघांनी संयमाने अर्धशतकी भागीदारी रचत भारताचा विजय जवळ आणला. विजयासाठी 20 धावांची गरज असताना शुभमन गिलने दोन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केलं अन् सामना देखील जवळ आणला.

गिल आणि जुरेलने नाबाद 72 धावांची भागीदारी रचत भारताला चौथ्या कसोटीत विजय मिळवून दिला. गिलने नाबाद 124 चेंडूत नाबाद 52 तर ध्रुव जुरेलने 77 चेंडूत 39 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. सामन्याचा चौथा दिवस आहे आज आणि निकाल लागल्या जाऊ शकतो. कारण टीम इंडियाला विजयासाठी 152 धावांची गरज आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपला. ज्यात जो रूटने शानदार शतक झळकावले. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 307 धावांवर आटोपला.

भारताकडून यशस्वी जैस्वाल (73) आणि ध्रुव जुरेल (90) यांनी धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 145 धावांवर आटोपला आणि भारतासमोर हे लक्ष्य ठेवण्यात आले. भारतीय संघाने आजचा हा सामना जिंकला तर ती मालिका 3-1 ने जिंकेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT