Shubman Gill esakal
Cricket

Shubman Gill IND vs ENG : वडिलांनी लावला नाराजीचा सूर... अखेर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याबाबत केला खुलासा

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill Open Up About Batting No 3 Position : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमन गिलने सांगितले की, कारकिर्दीतील खडतर पेचातून जात असताना पुन्हा सलामीला फलंदाजी करण्याबाबत विचार केला नव्हता. धर्मशाला येथे शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावणाऱ्या गिलला यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना धावा करण्यासाठी संघर्ष करत होता.

रोहित शर्मासह यशस्वी जैस्वालने डावाची सुरुवात केल्याने गिलला तिसरा क्रमांक देण्यात आला. गिलला तिसऱ्या क्रमांकावर स्थिरावण्यासाठी वेळ लागला. तब्बल 12 डावात अर्धशतक न ठोकू शकलेल्या गिलने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 400 हून अधिक धावा केल्या आहेत.

गिल म्हणाला की 'जेव्हा तुम्ही स्कोअर करत नाही, तेव्हा तुम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार करता, मी ही विचार करत होतो. पण ओपनिंगला परत जाणे ही माझ्या मनात आलेली गोष्ट नव्हती,'

'जेव्हा मी दुसऱ्या डावात फलंदाजीला जातो तेव्हा मला कळते की मी कोणत्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. मला माझ्या डावाला गती कशी द्यायची आणि त्याबद्दल कसे जायचे हे माहित आहे,'

शुभमन गिलचे वडील आणि त्याचे पहिले प्रशिक्षक लखविंदर यांना गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडले नाही.

ते म्हणाले की,"त्याने ओपनिंग सुरू ठेवायला हवं होतं. मला असं वाटतं त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळणं अजिबात बरोबर नाही. तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये जास्त वेळ बसलात, तेव्हा दबाव वाढतो. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सलामीवीरही नाही आणि तो मधल्या फळीतील फलंदाज देखील नाही.'

'गिलचा खेळ तसा नाही, तिसरा क्रमांक हा चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूसाठी योग्य आहे. तो बचावात्मक खेळ करतो आहे. जेव्हा चेंडू नवीन असतो तेव्हा तुम्हाला अधिक सैल चेंडू मिळतात, जेव्हा तुम्ही 5-7 षटकांनंतर येता तेव्हा चेंडू अजूनही चमकदार असतो आणि गोलंदाजही त्याच्या स्थिरावलेला असतो.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BR Shetty: एका रात्रीत नशिब बदललं; 880000000000 रुपयांची कंपनी फक्त 74 रुपयांना विकली; आता कोर्टाने ठोठावला 408 कोटींचा दंड

Diwali Sweets Alert: दिवाळीत खवा शुद्ध की भेसळयुक्त आहे कसा ओळखायचा? वाचा एका क्लिकवर

Kadamwakvasti fire: 'कदमवाकवस्ती येथील जेके सेल्सच्या गोडाऊनला भीषण आग; २ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक..

Latest Marathi News Live Update : वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन

Belagav Bank Election : 18 मतदारांना नामांकित हॉटेलमध्ये ठेवले डांबून? मतदान केंद्रापर्यंत जाण्यासही अडवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT