KL Rahul | Team India Sakal
Cricket

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. दरम्यान, या संघात निवड होण्याच्या जवळ असूनही काही खेळाडूंना मात्र संधी मिळालेली नाही, अशा खेळाडूंचा आढावा घेऊ.

Pranali Kodre

India Squad for T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा १ जून ते २९ जून दरम्यान होईल. आता या स्पर्धेसाठी सहभागी देशांतकडून संघाच्या घोषणा केल्या जात आहेत. नुकतीच बीसीसीआयनेही भारतीय संघाची घोषणा केली आहे.

भारताच्या निवड समितीने मुख्य संघात १५ खेळाडूंना संधी दिली आहे, तर राखीव खेळाडू म्हणून चौघांची निवड केली आहे. दरम्यान, या संघात निवड होण्याच्या जवळ असूनही काही खेळाडूंना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे सध्या तरी त्यांचे टी२० वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. अशाच ६ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

केएल राहुलची कारकिर्द संपुष्टात?

केएल राहुल हा असा खेळाडू आहे, जो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तसेच यष्टीरक्षणही करू शकतो. तो आयपीएल 2024 स्पर्धेतही लखनौ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व करण्याबरोबरच तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळत आहे.

तसेच त्याने यंदा आयपीएलमध्ये 9 सामन्यांत 42 च्या सरासरीने आणि 144 च्या स्ट्राईक रेटने 3 अर्धशतकांसह 378 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळवण्यासाठी शर्यतीत होता. परंतु, ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना पसंती मिळाल्याने त्याला संधी देण्यात आली आहे.

तसेच 15 जणांच्या संघात 2 यष्टीरक्षक असल्याने त्याला राखीव खेळाडूंमध्येही संधी दिलेली नाही.

अशात आता असाही प्रश्न उपस्थित होत आहे की त्याच्यासाठी भारताच्या टी20 संघाचे दरवाजे कायमसाठीच बंद झाले आहेत का? कारण त्याला गेल्या अनेक महिन्यांत भारताच्या टी20 संघात संधी मिळालेली नाही.

तो भारताकडून शेवटचा टी20 सामना नोव्हेंबर 2022 मध्ये खेळला आहे. त्यातच आता टी20 वर्ल्ड कपसाठीही त्याची निवड झाली नसल्याने त्याची टी20 कारकिर्द मात्र संपली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

या खेळाडूंनाही संधी नाही

दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करत आणखीही काही खेळाडूंनी लक्ष वेधले होते. यामध्ये ऋतुराज गायकवाड, रियान पराग, संदीप शर्मा, तिलक वर्मा अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.

या खेळाडूंचाही टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड होईल अशी चर्चा होती, मात्र, त्यांना 15 जणांच्या संघात तर संधी मिळालेली नाही, पण राखीव खेळाडूंमध्येही त्यांची वर्णी लागलेली नाही.

ऋतुराज गायकवाडने यंदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व करताना 9 सामन्यात 63.86 च्या सरासरीने 149 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 3 अर्धशकांसह 447 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रियान परागने ही आयपीएलच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी करत लक्ष वेधले होते.

दरम्यान, या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली होती. याशिवाय संदीप शर्मानेही राजस्थान रॉयल्सकडून वेगवान गोलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. त्याने एका सामन्यात 5 विकेट्सही घेतल्या होत्या.

याशिवाय तिलक वर्मानेही मुंबई इंडियन्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इतकेच नाही, तर तिलक या वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघातही होता. मात्र या खेळाडूंचे यंदा तरी टी20 वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत १२ वाजेपर्यंत ४०० हून अधिक श्रींचे विसर्जन

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे- तांबडी गणपतीचे विसर्जन

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT