Rinku Singh becomes casualty of Impact Player rule News Marathi sakal
Cricket

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

गेल्या आयपीएल हंगामात एका षटकात 5 षटकार मारून चर्चेत आलेल्या अलिगढचा 26 वर्षीय डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला राखीव खेळाडू म्हणून संघात ठेवण्यात आले आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup Team India Squad Selection : आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या आयपीएल हंगामात एका षटकात 5 षटकार मारून चर्चेत आलेल्या अलिगढचा 26 वर्षीय डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला राखीव खेळाडू म्हणून संघात ठेवण्यात आले आहे. तर निवडकर्त्यांनी शिवम दुबेचा समावेश केला आहे.

आयपीएलमधील बीसीसीआयच्या एका नियमामुळे पॉवर हिटर रिंकू सिंगचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण त्याला क्रिझवर जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. तर आयपीएलच्या चालू हंगामातील पहिल्या 10 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी क्रीजवर जास्त वेळ घालवल्यामुळे दुबेला टीम इंडियात संधी मिळाली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, रिंकूला इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा फटका बसला आहे यात शंका नाही. हार्दिक हा फॉर्ममध्ये नसला तरी तो भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला बाहेर करणे धोक्याचे ठरले असते.

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे रिंकूला कसे झाले नुकसान?

खरंतर, कोलकाता नाइट रायडर्सने रिंकूला फिनिशरची भूमिका दिली आणि त्याला पहिल्या पाचमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही. टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड होण्यापूर्वी त्याने 8 डावात फक्त 82 चेंडू खेळले, जे प्रत्येक डावात सुमारे 10 चेंडू आहेत. केकेआर संघासाठी भारतीय खेळाडूंपैकी श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी जास्ते षटके खेळली, ज्यामुळे शेवटी रिंकूला काही जास्त चेंडू खेळण्यासाठी राहिले नाही.

दुबेचा रेकॉर्ड रिंकूपेक्षा सरस

रिंकूला प्रमोट न केल्याबद्दल केकेआरला दोष देता येणार नाही. पण चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंग धोनी 2021 च्या हंगामापासून दुबेचा जास्तीत जास्त वापर करून घेत आहेत. आयपीएल 2024 च्या या हंगामात दुबेला आतापर्यंत 9 सामन्यात 203 चेंडू खेळण्यासाठी मिळाली. ज्यामध्ये दुबेने आतापर्यंत 24 चौकार आणि 26 षटकार मारले आहेत, तर रिंकूने 82 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत.

या हंगामात मध्यमगती गोलंदाज दुबे गोलंदाजी करत नाही. पण धोनीने त्याचे अचूक मूल्यांकन केले आहे. आणि संथ खेळपट्ट्यांवर त्याच्या पॉवर हिटिंग कौशल्यामुळे तो भारतीय संघात स्थान मिळवण्याचा दावेदार बनला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

SCROLL FOR NEXT