Virat Kohli And Rohit Sharma Likely To Open
Virat Kohli And Rohit Sharma Likely To Open  esakal
क्रिकेट

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट अन् रोहित करणार ओपन; निवडसमिती अन् बीसीसीआनेही...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli And Rohit Sharma Likely To Open in T20 World Cup 2024 : विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताकडून सलामीला उतरण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आणि निवडसमितीने देखील अजून हा विचार पूर्णपणे फेटाळलेला नाही. यामुळे संघातील समतोल साधण्यास देखील मदत होणार आहे.

विराट कोहलीने 2024 च्या आयपीएलमध्ये धडाकेबाज सुरूवात केली आहे. त्याने या कामगिरीद्वारे आगामी टी 20 वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात आपली दावेदारी ठोकली. विराट कोहली सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. प्रश्न फक्त वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सलामीला यावं का हा आहे. बीसीसीआय आणि निवडसमितीने याबाबत विचार करणं अजून बंद केलेलं नाही.

दोन जूनपासून टी 20 वर्ल्डकप सुरू होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. सलामीवीर म्हणून रोहित शर्मानं आपली जागा पक्की केली आहे. आता दुसरा सलामीवीर म्हणून विराट कोहलीची देखील चर्चा सुरू आहे. विराट कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमवारीबाबत देखील विचार सुरू आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने इनसाईड वेबसाईटला सांगितले की, 'नक्कीच एक सलामीवीर म्हणून विराट कोहलीबाबत नक्कीच चर्चा होऊ शकते. जर संघाला अशा कॉम्बिनेशनमध्ये अजून एका खेळाडूला संधी देण्यास मदत होत असेल तर विराटला सलामीला का खेळवलं जाऊ शकत नाही? बॅटिंगच्या स्थानाबाबत विराट कोहली अडून बसत नाही.

तो सातत्याने आयपीएलमध्ये आपल्या फ्रेंचायजीकडून सलामीला खेळत आला आहे. त्यामुळे तो सलामीला कसा खेळले हा प्रश्नच नाहीये. आता हा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यायचा आहे.

सलामीवीर विराटचे आकडे काय सांगतात?

विराट कोहलीने आयपीएलमध्ये आरसीबीकडून 103 सामन्यात सलामी दिली आहे. त्याने 45.66 च्या सरासरी आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने एकूण 3927 धावा केल्या आहेत. याचबरोबर विराट कोहलीने आठ आयपीएल शतके देखील ठोकली आहेत.

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 9 सामन्यात सलामी दिली असून त्याने 57.14 च्या सरासरी अन् 161.29 च्या स्ट्राईक रेटने 400 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक देखील आहे.

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT