Virat Kohli Video Viral Sakal
Cricket

Virat Kohli : विराटच्या कारचा दरवाजा उघडेना, तेवढ्यात फॅनने साधली संधी, मजेशीर Video Viral

Virat Kohli Viral Video: विराट कोहलीचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्याला कारचा दरवाजा उघडता येत नसल्याचे दिसले असून याचवेळी एका चाहत्याने संधीचा फायदा घेतल्याचेही दिसले.

Pranali Kodre

Virat Kohli Viral Video: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने नुकतेच शनिवारी (6 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील आठवे शतक ठोकले आहे. त्यामुळे तो त्याच्या या मैदानातील कामगिरीमुळे तर चर्चेत आहेच, पण नुकताच त्याचा एक मजेशीर व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होत आहे.

विराटच्या कारचा दरवाजाच उघडेना

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओ filmygyan या अकाउंटवरून शेअर केलेला समजून येत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की विराटला कुठेतरी जायचे असून तो त्याच्या काळ्या रंगाच्या कारच्या बॅकसीटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र, त्याच्या कारचा हा दरवाजा प्रयत्न करूनही उघडेना, त्याच्या आजुबाजूलाही लोक दिसत आहेत. दरम्यान, विराट कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतन असतानाच एका चाहत्याने मात्र त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याची संधी साधली.

या चाहत्याने विराट जाऊन ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसेपर्यंत पटकन आपल्या फोनमध्ये सेल्फी काढून घेतली. दरम्यान, नंतर विराट कारमध्ये बसला आणि निघाला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये filmygyan ने मजेने विराटच्या कारला सर्व्हिसिंगची गरज असल्याचे मजेने म्हटले आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्सही युजर्सकडून केल्या जात आहेत.

विराट दमदार फॉर्ममध्ये

विराट सध्या आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळत आहे. बेंगळुरू संघाला आत्तापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण असे असले तरी विराट मात्र दमदार फॉर्ममध्ये खेळत आहे.

त्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामात आत्तापर्यंत 5 सामन्यांमध्ये 105.33 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका शतकाचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तो यंदाच्या हंगामात 300 धावा पार करणारा पहिलाच खेळाडूही आहे.

विराटचे विक्रमी आठवे शतक

बेंगळुरूने आयपीएल 2024 मधील पाचवा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. या सामन्यात विराटने 113 धावांची नाबाद खेळी केली. हे त्याचे आयपीएलमधील आठवे शतक ठरले. तो आयपीएलमध्ये आठ शतके करणारा पहिलाच क्रिकेटपटू आहे.

मात्र, त्याच्या या शतकानंतरही बेंगळुरूला राजस्थानविरुद्ध 6 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानकडून जॉस बटलरने 100 धावांची नाबाद खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT