Why Ricky Ponting Rejected BCCI Offer To Be India Head Coach sakal
Cricket

India Head Coach : टीम इंडियाच्या नवीन मुख्य कोचबाबत मोठी अपडेट! विश्वविजेत्या दिग्गजाने नाकारली BCCIची ऑफर

India Head Coach Update News : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार 2 जूनपासून रंगणार आहे. आणि वर्ल्ड कप संपल्यानंतर भारतीय संघाचे विद्यमान मुख्य कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे.

Kiran Mahanavar

India Head Coach Update News : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार 2 जूनपासून रंगणार आहे. आणि वर्ल्ड कप संपल्यानंतर भारतीय संघाचे विद्यमान मुख्य कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय आधीच भारतीय संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात व्यस्त आहे.

मुख्य प्रशिक्षक होण्याच्या या शर्यतीत अनेक खेळाडूंचा सहभाग आहे पण एकापाठोपाठ एक दिग्गज ही जबाबदारी सांभाळण्यास नकार देत आहेत. राहुल द्रविडने आधीच कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे. आरसीबीच्या पराभवानंतर बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनीही यासाठी नकार दिला. आता आणखी एका माजी दिग्गज खेळाडूने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे.

भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण असेल हा मोठा प्रश्न आहे. दररोज अनेक दिग्गजांची नावे पुढे येत आहेत, जे या पदासाठी शर्यतीत आहेत. या मालिकेत आणखी एका दिग्गज खेळाडूने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे. हा दिग्गज खेळाडू दुसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेत्या खेळाडू रिकी पाँटिंग आहे.

आयपीएल दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने हे रहस्य उघड केले आहे. पॉन्टिंगला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र पाँटिंगने कारण सांगून ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

पॉन्टिंग म्हणाला की, आयपीएलदरम्यान मला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. माझ्या मुलाची इच्छा आहे की मी ही ऑफर स्वीकारावी, पण मी तसे करणार नाही, कारण मला माझ्या कुटुंबाला वेळ देता येणार नाही. जर मी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झालो तर मी आयपीएल फ्रँचायझीसोबत काम करू शकणार नाही. हे सर्वांनाच ठाऊक आहे. याशिवाय राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाला 10-11 महिने व्यस्त राहावे लागते आणि हे माझ्या जीवनशैलीत बसत नाही. म्हणूनच मी मुख्य प्रशिक्षक बनू शकत नाही. मी पाहिले की कोचिंगसाठी आणखी काही नावे पुढे येत आहेत. जस्टिन लँगर, स्टीफन फ्लेमिंग आणि गौतम गंभीर यांची नावे पुढे आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांना अडचणीत आणायला जरांगेंना रसद पुरवताय का? शिंदे म्हणाले, मी लपून-छपून काही करत नाही

राज्य सरकार घेणार ‘हे’ 2 मोठे निर्णय! 5 वर्षांत थकबाकीदार नसलेलाच यापुढे ग्रामपंचायत निवडणुकीस पात्र; ग्रामपंचायतीचा एकरकमी कर भरल्यास मिळणार 50 टक्के माफी

Hotel Bhagyashree : जरांगेंचं आंदोलन सुरु असेपर्यंत हॉटेल भाग्यश्री बंद; आंदोलकांसाठी ट्रकभर शिधा मुंबईला पाठवला...

Latest Marathi News Updates : राज्यासह देशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

१० बाय ५ फूटाची खोलीत पाच जणांचा संसार! रात्री गाढ झोपेत असताना लिकेज झाला गॅस सिलिंडर अन्‌... सोलापूर शहरातील घटना

SCROLL FOR NEXT