Wiaan Mulder | South Africa vs Zimbabwe Test Sakal
Cricket

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळाला नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Wiaan Mulder Triple Century: दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने कसोटीत त्रिशतक केलं आहे. त्याने या त्रिशतकासह दोन मोठे वर्ल्ड रेकॉर्ड केले.

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघात कसोटी मालिकेा होत असून या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार विआन मुल्डरने गाजवला आहे. बुलावायो येथे होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत अष्टपैलू मुल्डरने त्रिशतकी खेळी करता अनेक विक्रम मोडले आहेत.

या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने तेंबा बावूमा, एडेन मार्करमसह अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे केशव महाराजने पहिल्या सामन्यात नेतृत्व केले होते, तर रविवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत मुल्डर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे.

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी टोनी डी झोर्झीला १० धावांवर तनका चिवंगाने आणि लेसेगो सेनोक्वानेला ३ धावांवर वेलिंग्टन मसक्झदाने बाद केले. पण नंतर मुल्डर आणि डेव्हिड बेडिंगघम यांनी १८४ धावांची भागीदारी केली. बेडिंगघम ८२ धावांवर बाद झाला. नंतर लुआन-ड्रे प्रेटोरियसने मुल्डरला साथ दिली. त्यांच्यातही २१७ धावांची मोठी भागीदारी झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेने ४०० धावांचा टप्पा पार केला होता. मुल्डरने याचदरम्यान अडीचशे धावाही पूर्ण केल्या होत्या.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही मुल्डरने त्याचा आक्रमक खेळ पुढे सुरूच ठेवला. त्याने सुरुवातीलाच २९७ चेंडूत त्याचं पहिलं-वहिलं त्रिशतक पूर्ण केले. तो कसोटीत त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमलानंतरचा दुसराच क्रिकेटपटू ठरला. त्याला डेवाल्ड ब्रेविसने साथ देत होता. पण तोही ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर वेरियन मुल्डरला साथ देण्यासाठी आला. मुल्डरने साडेतीनशे धावांचा टप्पाही पार केला. तो ४०० धावा करून ब्रायन लारा यांचा कसोटीतील सर्वोच्च धावांचा विक्रम मोडेल असं चित्र होतं. मात्र त्याने ११४ षटकात ५ बाद ६२६ धावांवर संघ पोहचल्यानंतर स्वत:च डाव घोषित केला. ज्यावेळी डाव घोषित केला, त्यावेळी मुल्डर ३३४ चेंडूत ३६७ धावांवर नाबाद होता, तर वेरियन ४२ धावांवर नाबाद होता. मुल्डरला ४०० धावांसाठी केवळ ३३ धावा कमी होत्या.

मुल्डरचे विक्रम

मुल्डर कसोटीमध्ये सर्वात कमी चेंडूत त्रिशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने हॅरी ब्रुकला मागे टाकले आहे. ब्रुकने २०२४ मध्ये मुलतान कसोटीत पाकिस्तानविरुद्ध ३१० चेंडूत त्रिशतक केले होते. या यादीत अव्वल क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग असून त्याने २७८ चेंडूत २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईमध्ये त्रिशतक केले होते. याशिवाय परदेशात कसोटीत सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रमही मुल्डरच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या हनिफ मोहम्मदच्या नावावर होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ब्रिजटाऊनमध्ये १९५८ साली ३३७ धावांची खेळी केली होती. याशिवाय मुल्डर परदेशात सर्वोच्च धावांची खेळी करणारा कर्णधारही ठरला आहे.

परदेशात कसोटीमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारे फलंदाज

  • नाबाद ३६७ धावा - विआन मुल्डर (द. आफ्रिका वि. झिम्बाब्वे, २०२५)

  • ३३७ धावा - हनिफ मोहम्मद (पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज, १९५८)

  • नाबाद ३३६ धावा - वॅली हेमंड (इंग्लंड वि. न्यूझीलंड, १९३३)

  • नाबाद ३३४ धावा - मार्क टेलर - (ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, १९९८)

परदेशात कसोटीमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारे कर्णधार

  • नाबाद ३६७ धावा - विआन मुल्डर (द. आफ्रिका वि. झिम्बाब्वे, २०२५)

  • नाबाद ३३४ धावा - मार्क टेलर - (ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, १९९८)

  • ३११ धावा - बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, १९६४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: 24 तासांत 1,31,000 कोटी रुपयांचे नुकसान; इलॉन मस्क यांची संपत्ती रोज कमी का होत आहे?

kalyan Crime : कल्याण हादरले ! धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ठाण्यातून अपहरण केले अन्...

वाढलेले थायरॉईड कमी करण्यासाठी कोणते फळ खावे? वाचा एका क्लिकवर

उपायुक्तच बनल्या मालकीणबाई? मसाज, भांडीकुंडी अन् धमक्या… व्हिडिओ व्हायरल! सफाई कामगार महिलेचे धक्कादायक आरोप

समलैंगिक संबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; CAची आत्महत्या; 22 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT