Manoj Tiwari
Manoj Tiwari E Sakal
क्रीडा

क्रिकेटर टू लव्हर बॉय; क्रीडा मंत्री तिवारींचा भन्नाट प्रवास

सुशांत जाधव

कोलकाताः तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर राजकीय मैदानात एन्ट्री मारलेला माजी क्रिकेटर मनोज तिवारी (Manoj Tiwari) पश्चिम बंगालचा (West Bengal) क्रीडा मंत्री झालाय. ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी त्यांनी आपल्या मंत्रिमंडलाचा विस्तार केला. यावेळी 43 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात माजी क्रिकेट मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचाही समावेश आहे.

मनोज तिवारी यांच्याकडे ममता बनर्जी सरकारने खेळ आणि युवा राज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिलीये. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज तिवारी यांनी आपल्या पत्नीसह तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला होता. हावडामधील शिबपुर विधानसभा मतदार संघातून त्यांनी विजय नोंदवला होता.

रणजी ट्राफीतील कामगिरीच्या जोरावर मिळाली होती टीम इंडियात संधी

मनोज तिवारी याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फारच अल्प राहिली असली तरी 2006-07 हंगामातील रणजी ट्रॉफीत त्याने लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती. या हंगामात मनोज तिवारीने 99.50 च्या सरासरीने 796 धावा कुटल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. पण बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. 2008 मध्ये त्याने पहिला वनडे सामना खेळला.

संधी मिळाली पण त्याचं सोनं झालं नाही

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या मनोज तिवारीला आंतरराष्ट्रीय सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. 12 वनडे आणि 3 टी-20 सामन्यात त्याने टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले. यात एक शतक आणि अर्धशतक त्याच्या नावे आहे. 2015 मध्ये त्याने झिम्बाब्वे विरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता.

IPL मध्ये तीन संघाकडून प्रतिनिधीत्व

आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात मनोज तिवारी दिल्ली डेयरडेविल्स (दिल्ली कॅपिटल्स) च्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. त्यानंतर 5 वर्षे कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळल्यानंतर 2017 मध्ये तो रायझिंग पुणे सुपर जाएंट्सच्या संघातून खेळताना दिसले. मनोज तिवारीने 98 सामन्यात 7 अर्धशतके झळकावली आहेत.

7 वर्षांच्या अफेअरनंतर लग्न

क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय मनोज तिवारी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्व आहे. हावडा येथील सुष्मिता रॉय आणि मनोज तिवारी यांच्यातील लव्ह अफेयरची चांगलीच चर्चा रंगली होती. 2006 पासून दोघांमधील प्रेम फुलत गेले. 7 वर्षांच्या सहवासानंतर 2013 मध्ये दोघांनी विवाह केला होता.

cricketer manoj tiwari became sports minister in mamta banerjee cabinet west bengal election

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT