Cricketer Vinod Kambli Businessmen Sandeep Thorat  esakal
क्रीडा

Vinod Kambli : विनोद कांबळीला अखेर मिळाली नोकरी! थोरातांची ऑफर स्विकारली

अनिरुद्ध संकपाळ

Vinod Kambli Sandeep Thorat : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने काही दिवसांपूर्वी आपण मोठ्या आर्थिक विवंचनेत असल्याचे सांगितले होते. त्याने एमसीएकडे नोकरीची मागणी देखील केली होती. तो उदरनिर्वाहासाठी सध्या बीसीसीआयच्या पेन्शनवरच अवलंबून असल्याचे म्हणाला होता. त्यावेळी त्याला मराठी उद्योजक संदीप थोरात (Businessmen Sandeep Thorat) यांनी 1 लाख महिना पगाराची नोकरी ऑफर (Job Offer) केली होती.

विशेष म्हणजे त्यानंतर बरेच दिवस विनोद कांबळीने ही नोकरी स्विकारली की नाही याबाबत माहिती मिळत नव्हती. मात्र आता सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळीला थेट त्याच्या घरी जावून ऑफर लेटर दिले. त्यानंतर विनोद कांबळीने थोरात यांची नोकरीची ऑफर आपण स्विकारली असल्याचे सांगितले. आता विनोद कांबळी सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीच्या मुंबई शाखेत मानद संचालक पदावर कार्यरत होईल.

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची घरची परिस्थिती बेताचीच होती. मात्र विनोद कांबळीने जिद्दीने क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवत भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला होता. कोरोना काळानंतर त्याच्या हातात काम नव्हते. सचिनबरोबरच आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दिला सुरूवात करणाऱ्या विनोद कांबळीची जीवनशैली कायम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

विनोद कांबळीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो मुश्किलीने आपले कुटुंब चावलत आहे. मला नोकरीची गरज आहे. विनोदने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे नोकरीची मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून अद्याप तरी कोणता प्रतिसाद आलेला नाही. विनोद कांबळीने कसोटीत भारताकडून सर्वात वेगाने 1 हजार धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्याने सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा फक्त एक डाव जास्त खेळून कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT