Danish Kaneria Shahid Afridi India Enemy esskal
क्रीडा

'भारत आपला शत्रू नाही'; कनेरियाने आफ्रिदीला सुनावले

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांच्यातील शाब्दिक युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शाहिद आफ्रिदीने दानिश कनेरियाने हिंदू असल्यामुळे माझा छळ केला या आरोपाचे खंडन केले. त्यावेळी त्याने कनेरिया स्वस्तातल्या प्रसिद्धीसाठी आपल्या शत्रू देशाशी (Enemy Country) बोलतो असा आरोप केला होता. याला आता दानिश कनेरियाने प्रत्युत्तर दिले आहे.

दानिश कनेरियाने ट्विट केले की, 'भारत (India) हा आपला शत्रू नाही. जे लोक धर्माच्या नावावर माथी भडकवतात ते आपले शत्रू आहेत. तू जर भारताला शत्रूराष्ट समजत असशील तर तू कोणत्याही भारतीय माध्यामांसमोर मुलाखत देऊ नये.' तो पुढे म्हणाला की, 'ज्यावेळी मी सक्तीच्या धर्मांतराबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला माझे करिअर उद्धवस्त करण्याची धमकी देण्यात आली.'

कनेरियाने आफ्रिदीवर तो धर्मामुळे माझा छळ करायचा असा आरोप केला होता. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने देखील आपली बाजू मांडली होती. तो म्हणाला होता की, 'जर माझे वागणे चुकीचे होते तर त्यावेळी त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संबंधित विभागाकडे तक्रार का केली नाही. तो आपल्या शत्रू राष्ट्राला मुलाखत देत आहे त्यामुळे धार्मिक भावना भडकू शकतात. माझ्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे चारित्र्यही पहावे.'

आफ्रिदी पुढे म्हणाला होता की, 'कनेरिया माझ्यासाठी छोट्या भावासारखा होता. मी त्याच्यासोबत अनेक वर्ष क्रिकेट खेळलो आहे. तो माझ्यावर स्वस्तातल्या प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी आरोप करत आहे. प्रत्येकाला त्याचे चारित्र्य माहिती आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT