David Beckham  esakal
क्रीडा

डेव्हिड बेकहमच्या वडिलांनी ७३ व्या वर्षी केले लग्न

अनिरुद्ध संकपाळ

फुटबॉल (Football) जगतातला चिरतरुण फुटबॉलपटू म्हणून ओळख असणाऱ्या डेव्हिड बेकहमचे (David Beckham) वडील वयाच्या ७३ व्या वर्षी बोहल्यावर चढले. टेड (Ted) यांनी सॉलिसिटर हिलरी मेरेडेथ यांच्याशी विवाह केला आहे. या विवाहाला बेकहम कुटुंब उपस्थित होते.

मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) स्टार माजी खेळाडू डेव्हिड बेकहम (David Beckham) आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया आपल्या चार मुलांसह डेव्हिड बेकहमच्या वडिलांच्या लग्नाला उपस्थित होते. हा लग्नसोहळा सेंट्रल लंडनच्या लॉ डिस्ट्रिक्टमधील ऐतिहासिक टेंपलमध्ये पार पडला. यासाठी बेकहम आपल्या कुटुंबासह पोहचला.(David Beckham Father Ted Married at The Age of 73)

डेव्हिड बेकहम (David Beckham) बरोबरच त्याची बहीण ल्युसी देखील आपल्या वडिलांच्या लग्नाला हजर होती. याचबरोबर डेव्हिड बेकहमचा मुलगा रोमियो आपली गर्लफ्रेंड मिआ रेगन याच्यासोबत आला होता. हा विवाह सोहळा छोटा आणि कुंटुंब आणि जवळ्या मित्रांपुरता मर्यादित ठेवण्यात आला होता.

डेव्हिड बेकहमने आपल्या वडिलांच्या लग्नात बेस्ट मॅनच्या (Best Man) भुमिकेत होता. त्याने वडिलांची वेडिंग रिंग (Wedding Ring) पकडली होती आणि त्याने यावेळी स्पीचही दिले.

डेव्हिड बेकहमचे वडील ७३ वर्षांचे आहेत तर नववधू ही ६३ वर्षांची आहे. या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. त्यामुळे या दोघांनीही या लग्नाचा मोठा गाजावाजा केला नव्हता. या लग्नात संपूर्ण बेकहम कुटुंब आनंदी दिसत होते.

डेव्हिड बेकहमचे वडील टेड हे डेव्हिड बेकहमची आई सँड्रा (Sandra) यांच्यापासून २००२ मध्ये वेगळे झाले होते. त्यांनी ३३ वर्षाच्या संसारानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टेड आणि डेव्हिड बेकहम यांच्या नात्यात तणावही निर्माण झाला होता. याबाबतची माहिती डेव्हिड बेकहमने आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. मात्र ज्यावेळी टेड (Ted) यांना २००७ मध्ये ह्रदय विकाराचा झटका (Heart Attack) आला होता. त्यानंतर डेव्हिड बेकहम आपल्या वडिलांच्या पुन्हा जवळ आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Makar Sankranti 2026: तुळशीशी संबंधित 'या' 3 चुका टाळा, अन्यथा माता लक्ष्मी होईल नाराज

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT