David warner got out on golden duck for the first time after 9 years in ipl  esakal
क्रीडा

वॉर्नरच्या गोल्डन डकची 'अनहोनी कहानी' 9 वर्षापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती

वार्नर पंजाबविरुद्धच्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झाला.

धनश्री ओतारी

आयपीएल 15 व्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा फंलदाज म्हणजे डेव्हिड वॉर्नरला ओळखले जाते. मात्र, वार्नर पंजाबविरुद्धच्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झाला. त्याच्यासोबत अशीच घटना 9 वर्षापूर्वी पंजाबविरुद्धच घडली होती. कदाचित त्याच्यासोबतचा हा अनोखा योगायोग म्हणावा लागेल. विशेष म्हणजे त्या घटनेची तारीखदेखील 16 मे हीच होती.

या सामन्यात (Delhi Capitals vs Punjab Kings) पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून दिल्लीकडे प्रथम फंलदाजी दिली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सर्फराज खान (Sarfaraz Khan) सलामीला फलंदाजीला उतरले.

सामन्यातील पहिले षटक लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingston) पंजाबकडून टाकणार होता. त्याने पहिल्याच चेंडूवर वॉर्नरला चकवले. वॉर्नरने ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड पाँइंटला झेल दिला. त्याचा झेल राहुल चाहरने पकडला. त्यामुळे वॉर्नरला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट गमवावी लागली.

9 वर्षापूर्वी म्हणजेच आयपीएल 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता. त्यावेळी 16 मे दिवशी पंजाबविरुद्ध तो मैदानात उतरला होता. तो खेळण्यासाठी सज्ज झाला. पहिल्या चेंडूवर खेळला पण रन न काढताच बाद झाला. गोल्डन डक झाला.

आता तो 9 वर्षांनी पंजाबविरुद्ध खेळताना त्याच्यासोबत तेच घडले. मात्र, या वर्षादरम्यान वॉर्नर एकदाही गोल्डन डक झालेला नाही.

विशेष गोष्ट अशी की, सामन्याचा पहिला चेंडू खरंतर सर्फराज खेळणार होता. त्याने क्रिजवर फलंदाजीसाठी स्टान्स देखील घेतला होता. वॉर्नर नॉन-स्ट्रायकरला उभा होता. पण, लिव्हिंगस्टोन गोलंदाजी करणार असल्याचे पाहून पहिला चेंडू पडण्यापूर्वीच वॉर्नर सर्फराजजवळ आला आणि नंतर त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले.

यानंतर वॉर्नर पहिल्या चेंडूसाठी स्वत: स्टाईक घेताना दिसला. या घटनेवरून असे दिसून येत होते की, कदाचीत वॉर्नरनेच पहिला चेंडू खेळण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाची गोष्ट अशी की वॉर्नर तब्बल 9 वर्षांनी गोल्डन डकवर (Golden Duck) म्हणजेच पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT