Quinton de Kock esakal
क्रीडा

शतक ठोकणाऱ्या डीकॉकने आक्रमक जल्लोष का केला?

आयपीएलच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सने शानदार विजय मिळवला. या विजयात डी कॉकने मोलाचा वाटा उचलला.

धनश्री ओतारी

आयपीएलच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सने शानदार विजय मिळवला. बुधवारी झालेल्या सामन्यात लखनौ संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 धावांनी पराभव केला. यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक हा या विजयाचा हिरो ठरला. त्याने 70 चेंडूत 140 धावा केल्या. मॅचनंतर त्याने आपल्या अॅग्रेसिव्ह खेळीच खुलासा केला आहे.

मॅचनंतर डिकॉकने त्याच्या शतकी खेळावर भाष्य केले. मी माझ्या डावानंतर थोडो थकला होतो. मला वाटतं की सेंचुरीनंतर माझ्यातील फ्रस्ट्रेशन बाहेर आलं. मला आनंद होत आहे की मी क्रिजवर आलो आणि अशाप्रकारे खेळी खेळली. स्टेडिअममधील माझ्या नावाचा जयघोष पाहून मी पूर्ण भारवून गेलो. खेळून मला समाधान मिळालं.

तसेच, तो पुढे म्हणाला मला वाटलं नव्हते की मी इतका चांगला खेळेन. केकेआर जबदस्त खेळ केला. त्यांनी परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. एक वेळ अशी आली होती की मॅच आमच्या हातून निसटत होती. मात्र, एविन लुइसच्या कॅचने आमची बाजी पलटली. जसे म्हटले जाते की चांगल्या कॅचने मॅच जिंकवली. असे केकेआरचे कौतुक करत डीकॉकने आपल्या खेळसंदर्भात भावना व्यक्त केल्या.

मेगा लिलावात लखनौ संघाने डेकॉकला 6.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि विकत घेतले. डी कॉकने या हंगामात आतापर्यंत 14 सामने खेळले असून त्यात त्याने 502 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सामन्यात लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या. डी कॉकशिवाय कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात कोलकाता संघ 8 विकेट्सवर 208 धावाच करू शकला आणि सामना 2 धावांनी हरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT