Malika Handa Sakal
क्रीडा

Video : सरकार झालं 'मूकबधिर'; बुद्धिबळाच्या पटलावरील मलिकाचा संताप

बुद्धिबळाच्या पटलावरील 'अबोल' मलिका संतापली, ती नव्हे सरकारच मुकबधिर!

सुशांत जाधव

बुद्धीबळाच्या पटलावर अप्रतिम कामगिरी करुन दाखवत भारताच्या स्टार दिव्यांग खेळाडूनं अल्पावधित लोकप्रियता मिळवली. बुद्धिबळातील दर्जेदार खेळ करणाऱ्या मलिका हांडा (Chess Player Malika Handa हिने देशासाठी अनेक पदक जिंकली. पण आता तिच्यावर रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करण्याची वेळ आली आहे. पंजाब सरकारने (Punjab Government) आपल्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप मलिकानं केला आहे. राज्य सरकारने (State Government) जी आश्वासनं दिली होती त्याचा त्यांना विसर पडलाय, अशी खंत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे.

मलिकाने तिच्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यासोबतच तिने एक भली मोठी पोस्टही लिहिली आहे. दिमाखदार कामगिरीनंतर पंजाब सरकारने नोकरी आणि रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती. पण आता राज्याच्या क्रीडा मंत्र्यांना याचा विसर पडला आहे. 31 डिसेंबरला तिने यासंदर्भात क्रीडा मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी तिला धक्कादायक उत्तर मिळाले. मूकबधिर खेळाडूंसाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही मदत करु शकत नाही, असे तिला सांगण्यात आले. माजी क्रीडा मंत्र्यांनी नोकरी आणि रोख रक्कमेच्या रुपात बक्षीसाची घोषणा केली होती. यासंदर्भात तिला निमंत्रण पत्रिकाही आली होती. ते पत्र आजही तिच्याकडे आहे. पण हा कार्यक्रम कोरोनामुळे रद्द झाला आणि तिला राज्य सरकारने दिलेली आश्वासनही गायब झाली, अशी व्यथा तिने मांडली आहे.

पाच वर्षे वाया गेली

मलिकानं जी पोस्ट लिहिलीये त्यात म्हटलंय की, राज्याच्या माजी क्रीडा मंत्र्यांनी रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्याची घोषणा केली होती. यासंदर्भातील निमंत्रण पत्रही पाठवण्यात आले. पण कोरोनामुळे संबंधित कार्यक्रम होऊ शकला नाही. ही गोष्ट मी ज्यावेळी विद्यमान क्रीडा मंत्री परगट सिंह यांना सांगितली त्यावेळी मी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही, असे उत्तर मिळाले. ही घोषणा माजी मंत्र्यांनी केली होती मी नाही, असे तिला सांगण्यात आले. या सराकारने माझी पाच वर्षे वाया घालवली, असेही या खेळाडूच म्हणनं आहे.

कशी आहे मलिकाची कामगिरी

जन्मपासून आवाज आणि वाचा नसलेली मूकबधिर मलिका बुद्धिबळ स्पर्धेत भारताच प्रतिनिधीत्व करते. आंतरराष्ट्रीय डेफ चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा विक्रम तिच्या नावे आहे. असा पराक्रम करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली होती. तिने जागतिक आणि आशियाई चॅम्पियन स्पर्धेत 6 पदक जिंकली आहेत. 2012 मध्ये ती सातवेळा नॅशनल चॅम्पियन राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Model Village : डिजीटल शाळा, कचरामुक्त रस्ते, सीसीटीव्ही अन्... ; पुणे-मुंबईसारख्या शहरांना लाजवेल अशा या गावाची होतेय चर्चा!

IND vs NZ: शुभमन गिलने सोबत आणले तब्बल ३ लाखाचे वॉटर प्युरिफायर, इंदोरमधील दूषित पाण्याचा धसका?

Atal Setu Toll: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! अटल सेतूवर ५०% टोल सवलत लागू; कनेक्टिव्हिटीला मोठा दिलासा

Honda New Bike : होंडाकडून 2026 मध्ये 3 मोठे सरप्राइज! Rebel 300 ची लवकरच एन्ट्री; रेट्रो CB1000F अन् E-Clutch सोबत धावणार गाड्या

"12-12 तास मुलींपासून लांब, शारीरिक वेदना" पत्नी निवडणूक हरल्यानंतर अभिनेत्याने पोस्टमधून व्यक्त केल्या भावना

SCROLL FOR NEXT