Deepak Chahar Wedding Reception Photo Viral Netizens Confuse With Hasan Ali
Deepak Chahar Wedding Reception Photo Viral Netizens Confuse With Hasan Ali  esakal
क्रीडा

Deepak Chahar : दीपक चहरच्या लग्नात पाकिस्तानचा हसन अली?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) नुकताच लग्नबंधनात अडकला. त्याने आग्रा येथे गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत सात फेरे घेतले. दीपक चहरचे लग्न 3 जूनला कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार यांच्या साक्षीने झाले. त्याची रिसेप्शन पार्टी (Wedding Reception) ही दिल्लीत आयोजित केली होती. या रिसेप्शन पार्टीला भारतीय क्रिकेट संघातील (Team India) अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती. या सर्वांचा एक फोटो देखील व्हायरल (Photo Voral) होत आहे. दरम्यान, या सर्वांच्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती देखील उभी आहे. ही व्यक्ती कोण आहे याचा अंदाज लावण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती.

दीपक चहरच्या रिसेप्शनमध्ये अनेक भारतीय खेळाडू सामील झाले होते. त्यांचा एक फोटो देखील व्हायरल होत आहे. या फोटोत टीम इंडियातील खेळाडू सुटा-बुटात दिसत आहेत. या पार्टीला सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा देखील हजर होते. याचबरोबर भुवनेश्वर कुमार आणि पियुष चावला आपल्या कुटूंबियांसहित या रिसेप्शनमध्ये दिसले. या सर्वांमध्ये हिरवा कुर्ता घातलेल्या एका व्यक्तीने सर्वांचे कुतूहल वाढवले.

ट्विटरवरील काही नेटकऱ्यांना ऋषभ पंतच्या शेजारी उभ्या असलेला हा खेळाडू पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) वाटला. तर काही नेटकऱ्यांनी तो खलील अहमद असल्याचे सांगितले.

या पार्टीतील व्हायरल झालेल्या फोटोत दीपक चहरच्या सोबत (डावीकडून उजवीकडे) अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, दिशांत याज्ञनिक, शार्दुल ठाकूर, करण शर्मा, इशान किशन, मधुर खत्री, ऋषभ पंत उभे होते. ऋषभ पंतच्या शेजारी जो हिरव्या कुर्त्यात होता तो राजस्थानचा एक खेळाडू आहे. तो दीपकचा मित्र आहे असं सांगितलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT