Deepika Padukone unveiled FIFA World Cup trophy in qatar amide pathaan besharam rang saffron bikini controversy
Deepika Padukone unveiled FIFA World Cup trophy in qatar amide pathaan besharam rang saffron bikini controversy  
क्रीडा

FIFA World Cup 2022 : देशात बिकीनीवरून ट्रोल होणाऱ्या दीपिकाने कतारमध्ये केले वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण

सकाळ डिजिटल टीम

FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीचे भव्य उद्घाटन झाले. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. फिफा विश्वचषकात आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स पोहोचले आहेत. दीपिका पदुकोण देखील या काही स्टार्सपैकी एक आहे. 

दीपिका पादुकोणने माजी स्पॅनिश गोलकीपर आणि 2010 च्या विश्वविजेता संघातील खेळाडू इकर कॅसिलास यांच्यासमवेत फीफा वर्ल्डकप ट्रॉफी ( FIFA World Cup trophy) चे अनावरण केले .

सध्या दीपिका पदुकोण 'बेशरम रंग' या गाण्यावरून वादात सापडली आहे. 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे दीपिका ही अनेक संघटनांच्या निशाण्यावर आहे. सर्व वादांच्या दरम्यान, FIFA विश्वचषक 2022 चा फायनल पाहण्यासाठी ती पोहचली आहे. या कार्यक्रमातील दीपिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. 

12 डिसेंबर रोजी पठाण चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज झाले. हे गाणे काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. गाण्यातील दीपिकाच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना भुरळ घातली. पण म्युझिक व्हिडिओच्या एका सीनमध्ये दीपिका पदुकोण भगव्या रंगाची बिकिनी घातलेली दिसली. भगव्या रंगाची बिकिनी घालून दीपिकाने त्यांच्या भावना दुखावल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.  यावरून तिला ट्रोल करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT