IND vs NZ Disney Hotstar  esakal
क्रीडा

IND vs NZ : हॉटस्टारने लाईव्ह स्ट्रिमिंगचे सर्व विक्रम मोडले; यावेळी विराट विक्रमावेळी नाही तर...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs NZ Hotstar : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान हॉटस्टारने लाईव्ह व्ह्यूवरशिपचे सर्व विक्रम मोडले. याच सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ज्या ज्यावेळी विराट कोहलीची बॅट तळपली आहे त्या त्यावेळी हॉटस्टारने लाईव्ह व्ह्यूवरशिप बाबत विक्रमी आकडा गाठला आहे.

मात्र आजच्या सामन्यात विराट कोहलीने एवढा मोठा विक्रम करून देखील लाईम लाईट ही केएल राहुल आणि शुभमन गिलने पळवली. हे दोघे फलंदाजी करत असताना डिज्ने हॉटस्टारची लाईव्ह व्ह्यूवरशिप ही 5 कोटींपर्यंत पोहचली होती.

क्रिकेटच नाही तर संपूर्ण क्रीडा जगतात डिजीटल मीडियामध्ये एका सामन्याला लाभलेली ही सर्वात मोठी व्ह्यूवरशिप होती. यापूर्वी हाच विक्रम भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान झाला होता.

डिज्ने हॉटस्टारने भारत विरूद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यावेळी डिज्ने हॉस्टारने जागतिक स्तरावरील सर्व स्ट्रिमिंग रेकॉर्ड तोडले. भारताचा डाव संपत होता त्यावेळी लाईव्ह व्ह्यूवरशिप ही 5 कोटी पर्यंत पोहचली होती.

डिज्ने हॉटस्टारने यापूर्वी 4.4 कोटी लाईव्ह व्ह्यूवरशिपचा विश्वविक्रम केला होता. हा विक्रम याच वर्ल्डकपमध्ये 5 नोव्हेंबरला भारत - दक्षिण अफ्रिका सामन्यादरम्यान झाला होता. मात्र अवघ्या 10 दिवसात हा विक्रम देखील मोडला. गेल्या महिन्याभरात हॉटस्टारने व्ह्यूवरशिपचे अनेक विक्रम मोडले आहेत.

हॉटस्टारने यंदाचा आशिया कप आणि वर्ल्डकप हा भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत लाईव्ह स्ट्रीम (मोबाईल व्हर्जन) करण्याचा निर्णय घेतला होता. हॉटस्टारचे प्रतिस्पर्धी जिओ सिनेमाने आयपीएल स्पर्धा मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला होता. आता हॉटस्टारने वनडे वर्ल्डकप मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : 'मोर्चा निघणार म्हणजे निघणार..'; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर संदीप देशपांडेंचा इशारा

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT