Duleep Trophy 2023 Semi Final Controversy  
क्रीडा

भारतात क्रिकेटची पातळी खालावली; सामना जिंकण्यासाठी केले लाजिरवाणे कृत्य; BCCI करणार कारवाई?

Kiran Mahanavar

Duleep Trophy 2023 Semi Final : क्रिकेटला एकेकाळी जेंटल मॅन्स गेम म्हटले जायचे. अलीकडेच अॅशेस मालिकेदरम्यान जॉनी बेअरस्टोच्या स्टंपिंगवरून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात जोरदार वाद झाला होता. आता भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी एका संघाने सगळ्या सीमा ओलांडल्या.

पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत त्याच्या गोलंदाजांनी 53 मिनिटांत केवळ 5.5 षटके टाकली. आता यावर बीसीसीआय काही कारवाई करते की नाही हे पाहावे लागेल. प्रकरण दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील उत्तर विभाग आणि दक्षिण विभागाच्या सामन्यातील आहे. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरही उत्तर विभागावर प्रचंड संताप व्यक्त केला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर विभागाने पहिल्या डावात 198 धावा केल्या तर दक्षिण विभागाने 195 धावा केल्या. उत्तर विभागाचा संघ दुसऱ्या डावात 211 धावाच करू शकला. अशाप्रकारे रविवारी अखेरच्या दिवशी दक्षिण विभागाला विजयासाठी 215 धावांचे लक्ष्य मिळाले. पावसामुळे सामन्यावर परिणाम झाला.

सुर्य प्रकाशामुळेही सामन्यात अडथळा येऊ शकतो. अशा स्थितीत उत्तर विभागाचा कर्णधार जयंत यादव आणि त्याच्या गोलंदाजांनी वेळ वाया घालवायला सुरुवात केली. पहिल्या डावाच्या आधारे उत्तर विभागाला 31 धावांची आघाडी मिळाल्याने हे केले जात होते. अशा स्थितीत सामना अनिर्णित राहिला असता, तर नियमानुसार पहिल्या डावात आघाडी घेणारा संघ जिंकला असता.

पावसामुळे 100 मिनिटे नुकसान

पावसामुळे सुमारे 100 मिनिटांचा खेळ खराब झाला. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा दक्षिण विभागाला विजयासाठी 32 धावा करायच्या होत्या. यादरम्यान उत्तर विभागाच्या गोलंदाजांना 5.5 षटके टाकण्यासाठी 53 मिनिटे लागली. साई किशोर 11 चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला. त्याने जयंत यादववर षटकार ठोकत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. संघाने 36.1 षटकांत 8 विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल हा सामनावीर ठरला. दुसऱ्या डावात त्याने 57 चेंडूत 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मयंकने पहिल्या डावातही महत्त्वपूर्ण 76 धावा केल्या. आता अंतिम फेरीत दक्षिण विभागाचा संघ 12 जुलैपासून पश्चिम विभागाशी भिडणार आहे. पश्चिम विभागाने दुसऱ्या उपांत्य फेरीत मध्य विभागाचा पराभव केला. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने शतक झळकावले. पुजाराला येथे स्वत:ला सिद्ध करायचे आहे. खराब कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

SCROLL FOR NEXT