Dwayne Bravo IPL Retirement  ESAKAL
क्रीडा

Dwayne Bravo IPL Retirement : सीएसकेच्या ब्राव्होने घेतली IPL मधून निवृत्ती, दिसणार नव्या भुमिकेत

अनिरुद्ध संकपाळ

Dwayne Bravo IPL Retirement : चेन्नई सुपर किंग्जने अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. चेन्नईने त्याला लिलावापूर्वी रिलीज केले होते. त्यानंतर त्याने लिलावात भाग घेण्यापेक्षा निवृत्तीचा मार्ग पत्करला. जरी ब्राव्होने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आता आयपीएलमध्ये नव्या स्वरूपात दिसणार आहे.

ड्वेन ब्राव्हो सीएसकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील व्हिडिओत म्हणतो की, 'मी या नव्या प्रवासासाठी उत्सुक आहे. मी देखील माझे खेळण्याचे दिवस संपल्यानंतर देखील हेच करण्याचा विचार करत होते. मला गोलंदाजांबरोबर कामन करण्यात आनंद येतो. मी या नव्या भुमिकेबाबत उत्सुक आहे.'

ब्राव्हो पुढे म्हणाला, 'खेळाडू ते प्रशिक्षक या प्रवासात मला फार जळवून घ्यावे लागणार नाही. कारण मी खेळत असताना देखील मी गोलंदाजांशी संवाद साधून त्यांच्यासोबत काम करत होते. त्यांच्याशी रणनिती, नव्या कल्पना यांच्याशी चर्चा करत होतो. आपण फलंदाजाच्या एका पाऊल पुढे कसे राहू याबाबत देखील देवाण घेवाण करत होते. आता फक्त एकच फरक असणार आहे की मी आता मिड ऑन किंवा मिड ऑफला उभा असणार नाही.'

ब्राव्हो म्हणाला, 'मी आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होईन असे मला वाटले नव्हते. मात्र मला आयपीएल इतिहासाचा एक भाग असल्याचा खूप आनंद आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT