Emerging Asia Cup 2023 India vs Pakistan Final 
क्रीडा

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तानमध्ये आशिया कप फायनलचा थरार! कोण बनेल चॅम्पियन? कधी अन् कुठे पहायचा सामना

सकाळ ऑनलाईन टीम

Emerging Asia Cup 2023 India vs Pakistan Final : साखळी सामन्यात मिळवलेले वर्चस्व आणि उपांत्य सामन्यात बांगलादेशविरुद्ध लागलेला कस यामुळे पूर्णपणे तयार झालेल्या भारतीय इमर्जिंग क्रिकेट संघाला आज पाकला नमवून विजेतेपदाची अधिक संधी आहे..

भारत आणि पाक हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने येत आहेत, पण यावेळी विजेतेपदाचा सामना असणार आहे. भारताने स्पर्धेत अपराजित राहाण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे आत्मविश्वास साहजिकच यश धूलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडे असणार आहे. पाकिस्तानने गमावलेला एकमेव सामना भारताविरुद्धचा होता.

पाकविरुद्धचा अखेरचा साखळी सामना एकतर्फी जिंकल्यामुळे भारतीय संघाला विजेतेपदाचे स्वप्न पडू लागले होते; परंतु बांगलादेशने भारतीयांचे पाय जमिनीवर आणले. उपात्य सामन्यात केलेला संघर्ष भारतीय संघाला कमकुवत बाजूंवर विचार करायला लावणारा होता. भारतीय संघात 'अ' संघातून खेळलेले आणि आयपीएलचा अनुभव असलेले खेळाडू आहेत. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे हिरो निर्माण झाले आहेत. हीच भारतासाठी मोठी जमेची बाजू आहे.

साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निशांत सिद्ध या फलंदाजांनी मोठ्या धावा केल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध भारतीय संघ ७ बाद १३७ असा संकटात सापडला असताना कर्णधार यश धुलने ६६ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला २११ धावा करता अल्या महत्त्वाचे म्हणजे या धावा निर्णायक ठरवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT