Emma Raducanu Lost In Wimbledon 2022 Second Round  esakal
क्रीडा

Wimbledon 2022 | सौंदर्याची खाण एमा विंबल्डनच्या दुसऱ्याच फेरीत गारद

अनिरुद्ध संकपाळ

लंडन : युएस चॅम्पियन एमा राडुकानूला (Emma Raducanu) विंबल्डन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. कॅरोलिन ग्रासियाने तिचा 6-3, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत पुढची फेरी गाठली. आपल्या घरच्या मैदानावर आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या एमा राडुकानूने निराशा केली. (Emma Raducanu Lost In Wimbledon 2022 Second Round)

एमा ही जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर आहे. मात्र विंबल्डनमध्ये (Wimbledon 2022) तिला दुखापतींचा सामना करावा लागला. अशा स्थिती 55 व्या स्थानावर असलेल्या फ्रेंच केरोलिना ग्रासियाने तिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. 19 वर्षाच्या राडुकानूने पहिली सर्विस ब्रेक केल्यानंतर जारदार पुनरागमन केले होते. मात्र त्यानंतर ग्रासियाने सामन्यावर आपली पकड मिळवली.

ग्रासिया सामन्यानंतर म्हणाली, 'एमा ही एक मोठी खेळाडू आहे. हे तिचे होम ग्राऊंड आहे. याचबरोबर तिने मोठ्या स्पर्धांमध्ये ती चांगली कामगिरी करू शकते हे यापूर्वीच सिद्ध करून दाखवले आहे. मला सेंटर कोर्टवर खेळताना मजा आली. ही माझी सेंटर कोर्टवर खेळण्याची पहिलीच वेळ होती हे खूप खास आहे.'

एमा राडुकानूने गेल्या वर्षी फ्लशिंग मेडोव्हजमध्ये थरारक विजय मिळवला होता. मात्र त्यावेळी तिला दुखापत झाली होती ती अजूनही बरी झालेली नाही. याचबरोबर तिला एक दीर्घकाळ प्रशिक्षक देखील मिळवण्यात अपयश येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT