reece topley gets wicket virat kohli 
क्रीडा

VIDEO: दिवस बदलले-गोलंदाज बदलले, पण बदलत नाही तर विराटच!

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही या सामन्यात पण फार काही करू शकला नाही

Kiran Mahanavar

Virat Kohli England vs India 3rd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज मँचेस्टरच्या मैदानावर खेळला जाता आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 45.5 षटकांत 259 धावा केल्या. मात्र भारताची सुरुवात खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाज रीस टोपलीने भारतीय संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. अवघ्या 38 धावांपर्यंत भारतीय संघाने पहिले 3 विकेट गमावले. त्यात विराट कोहलीही आऊट झाला.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही या सामन्यात पण फार काही करू शकला नाही. 22 चेंडूत 17 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. आता जवळपास महिनाभराच्या ब्रेकनंतर चाहत्यांना आता तो अॅक्शन करताना दिसणार आहे. रीस टोपलीने त्याला झेलबाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर कोहली पुन्हा एकदा बाद झाला.

पुन्हा एकदा विराट कोहली बाहेर जाणारा चेंडू समजून घेण्यात अयशस्वी ठरला. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तर दुसऱ्या सामन्यात डेव्हिड विलीने बाहेर जाणार्‍या चेंडूवर विराटला आऊट केले, आणि तिसऱ्या सामन्यात विराटने पुन्हा एकदा तीच चूक पुन्हा केली. रीस टोपलीने विराट कोहलीला 17 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर आऊट केले. अशा स्थितीत आता मैदान बदलते, गोलंदाज बदलतात पण बदलत नाही तर विराटच असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT