Washington Sundar File Photo
क्रीडा

ENG vs IND : इंग्लंडला मदत करणं टीम इंडियाच्या आलं अंगलट

मोठ्या मालिकेपूर्वी टीम इंडियातील दुसऱ्या खेळाडूवर दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आलीये.

सुशांत जाधव

England vs India Test : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. राखीव गोलंदाजापैकी आवेश खाननंतर आता युवा अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर (Washingotn Sundar is ruled out) यानेही इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतलीये. 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मोठ्या मालिकेपूर्वी टीम इंडियातील दुसऱ्या खेळाडूवर दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आलीये. (Eng vs Ind Indian Cricket Team Young Allrounder Ruled Out Of England Tour Marathi latest News) आवेश खान याच्या डाव्या हाताचा अंगठा फॅक्चर असून अशीच दुखापत वाशिंग्टन सुंदरलाही झाली आहे. त्याच्या दुखापतीसंदर्भात अधिक माहिती समोर आली नसली तरी बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडू कसोटीसाठी उपलब्ध असणार नाहीत. वाशिंग्टन सुंदरला दुखापतीतून सावरण्यासाठी जवळपास 6 आठवड्यांचा अवधी लागणार असून तो मालिकेला मुकणार आहे. त्याच्यापूर्वी राखीव खेळाडू असलेल्या आवेश खान स्पर्धेला मुकणार असल्याची बातमी आली होती.

दोन्ही खेळाडू डरहम काउंटी क्रिकेट क्लबकडून तीन दिवसांच्या सराव सामन्यासाठी मैदानात उतरले होते. ईसीबीने भारतीय क्रिकेट संघासोबतच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये 11 खेळाडू मैदानात उतरण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे दोघांना डरहम काउंटी क्रिकेट क्लबच्या संघात जागा मिळाली होती. आवेश खानने या सामन्यात उत्तम गोलंदाजी केल्याचेही पाहायला मिळाले. पण हनुमा विहारीचा एक चेंडू अडवताना आवेश खान दुखापतग्रस्त झाला. या दोघांपूर्वी शुभमन गिल दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतला होता.

भारतीय संघासमोर यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यानंतर टीम मॅनेजमेंटने बीसीसीआयकडे पर्यायी खेळाडूची मागणी केली होती. मात्र ती मान्य झाली नव्हती. आता आणखी दोन खेळाडू जायबंदी झाल्यानंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंड दौऱ्यावर 24 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली होती. आता संघात सिलेक्शनसाठी 21 जण उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT