Dan Lawrence as replacement for Harry Brook News 
क्रीडा

Ind vs Eng : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेआधी संघात मोठा बदल! 'या' दिग्गज खेळाडूची अचानक ताफ्यात एन्ट्री

Dan Lawrence as replacement for Harry Brook News |

Kiran Mahanavar

India vs England Series 2024 : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला. ब्रूकच्या जागी कोण येणार हा प्रश्न होता. आता इंग्लंडच्या व्यवस्थापनाने हॅरी ब्रूकच्या बदलीची घोषणा केली आहे.

हॅरी ब्रूकच्या जागी डॅन लॉरेन्सचा संघात समावेश केला आहे. डॅन लॉरेन्सला भारतीय भूमीवर खेळण्याचा अनुभव आहे. तो तीन वर्षांपूर्वी 2021 मध्ये भारताच्या कसोटी मालिकेसाठी दौऱ्यावर आलेल्या संघाचा भाग होता. आणि चारपैकी दोन कसोटीत तो खेळला होता. त्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथी कसोटी खेळली जिथे त्याने पहिल्या डावात 46 धावा आणि दुसऱ्या डावात 50 धावा केल्या. मात्र, इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 25 धावांनी गमावला.

2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केल्यापासून लॉरेन्सने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यांमध्ये 29 च्या सरासरीने आणि 53.86 च्या स्ट्राइक-रेटने 551 धावा केल्या आहेत. या उजव्या हाताच्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या 91 अशी आहे. यासोबतच त्याने चार अर्धशतकेही केली आहेत. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत डॅनला संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इंग्लंड संघ -

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, डॅन लॉरेन्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT