Reece Topley to miss T20 World Cup 2022 
क्रीडा

T20 World Cup : सुपर-12 आधीच इंग्लंडला मोठा धक्का, 'हा' गोलंदाज बाहेर!

पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाली होती.

Kiran Mahanavar

Reece Topley to miss T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 ला सुरूवात झाला आहे. इंग्लंडचा संघ या स्पर्धेतील पहिला सामना 22 ऑक्टोबरला खेळणार आहे. याआधीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रतिभावान डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टोपली दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी क्षेत्ररक्षणादरम्यान त्याला दुखापत झाली होती.

इंग्लंडचा संघ पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. रीस टोपली फक्त पहिल्याच सामना खेळणार नाही. मात्र आता तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर पडणे हा त्याच्यासाठी मोठा धक्का आहे. टोपलेच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूचा संघात समावेश करण्याची घोषणा इंग्लंडने अद्याप केलेली नाही.

टोपली यांची आतापर्यंतची कारकीर्द चांगली राहिली आहे. त्याने 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 24 धावांत 6 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. 22 धावांत 3 बळी ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

टी20 विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे. या सामन्यानंतर संघ 26 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये सामना खेळणार आहे. 28 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. यानंतर संघ 1 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरेल. इंग्लंडचा संघ 5 नोव्हेंबरला सिडनी येथे शेवटचा गट सामना खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT