England vs India, 2nd Test : लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लिश कर्णधार ज्यो रुटने आपल्या नावाला साजेसा खेळ केला. त्याने केलेल्या नाबाद 180 धावांच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या दिवसाअखेर 27 धावांची आघाडीही घेतली. कसोटी कारकिर्दीतील 22 वे शतक झळकवताना ज्यो रुटच्या भात्यातून खास फटकेबाजी पाहायला मिळाली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर त्याने खेळलेल्या रिव्हर्स स्कूप शॉट डोळ्याचे पारणे फेडणारा असा होता. कसोटी क्रिकेटमध्ये रुटने टी-20 स्टाइलमध्ये खेळलेला फटका पाहून सिराजही अवाक झाल्याचे पाहायला मिळाले. हल्ली पंतच्या भात्यातून असा फटका सातत्याने पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतच्या स्कूप शॉटची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे काही चाहत्यांना ज्यो रुटने पंतची कॉपी केलीये, असेही वाटू शकते.
सिराजने फेकलेल्या गुड लेंथवरील चेंडू रुटने स्लिपमधून सीमारेषेपलीकडे धाडण्यात यशस्वी ठरला. ज्यो रुटचा हा फटका पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. चेंडूने सीमारेषा ओलांडल्यानंतर मात्र स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. एका बाजूने विकेट पडत असताना रुटने कर्णधाला साजेसा खेळ करत शेवटपर्यंत एका बाजूने खिंड लढवली. क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात तो पुन्हा एकदा द्विशतकाला गवसणी घालेल, असे वाटत होते. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. परिणामी इंग्लंडचा डाव चारशेच्या आत गुंडळला. रुटला 180 धावांवर नाबाद परतावे लागले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील नॉटिंघमच्या मैदानातील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (83) आणि लोकेश राहुल (129) धावांमुळे रुटचा निर्णय व्यर्थ ठरला.
दुसऱ्या दिवशी जेम्स अँडरसनच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडने सामन्यात कमबॅक केले. पण इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली आणि इंग्लंडचा संघ पुन्हा अडचणीत सापडला. रुटने जॉनी बेयरस्टोसोबत केलेली शतकी भागीदारी आणि त्यानंतर बटलर आणि मोईन अलीसोबत केलेल्या अर्धशतकी भागीदारीसह संघाचा डाव सावरला. सुरुवातीला बॅकफूटवर असलेल्या इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या दिवसाअखेर सामन्यात अल्पशी आघाडी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.