Moeen Ali Statement About Lahore esakal
क्रीडा

PAK vs ENG : लाहोरने निराश केलं असं इंग्लंडचा कर्णधार मोईन अली का म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Moeen Ali Statement About Lahore : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच सात टी 20 सामन्यांची मालिका पार पडली. यातील काही सामने पेशावर आणि काही सामने लाहोर येथे खेळवण्यात आले. पाहुण्या इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्यातच मातीत 4 - 3 असे लोळवत मालिका खिशात टाकली. दरम्यान, मालिका झाल्यानंतर मोईन अली पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी त्याने पाकिस्तानने इंग्लंडला पुरवलेली सुरक्षा व्यवस्था, जेवण यावर आपले मत मांडले. यावेळी त्याने लाहोरमध्ये मजा आली नाही. त्यापेक्षा पेशावर चांगलं होतं असे वक्तव्य केले.

मोईन अली म्हणाला की, मी लाहोरकडून थोडा निराश झालो. कराची खरंच खूप चांगलं होतं. मोईन अलीने हे वक्तव्य दोन्ही शहरातील जेवणावरून केलं होतं. सध्या मोईन अलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोईन अली पाकिस्तानने पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील बोलला. तो पाकिस्तानच्या सुरक्षा व्यववस्थेवर खुष दिसला.

तो म्हणाला की, आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा चांगली व्यवस्था मिळाली. आमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आली. कराची आणि लाहोर पाकिस्तानची दोन मोठी शहरे आहेत. ही शहरे खेळातील प्रतिस्पर्धेसाठी ओळखली जातात. दोन्ही ठिकाणावरून अनेक दिग्गज क्रिकेटपटू क्रिकेट जगताला मिळाले आहेत.

मालिकेचा विजेता ठरवणाऱ्या सातव्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 67 धावांनी पराभव करत मालिका 4 - 3 अशी खिशात टाकली. इंग्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 210 धावांचे आव्हान ठेवले होते. डेव्हिड मलानने सर्वाधिक नाबाद 78 धावा केल्या. पाकिस्तानला 210 धावांचा पाठलाग करताना 20 षटकात 8 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishal Patil Sugarcane Price Meeting : ऊसदराच्या बैठकीत खासदार विशाल पाटील भडकले; स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी खडाजंगी, सभागृहात गोंधळ

Satej Patil Protest March : गोकुळमधील सत्तासंघर्ष पेटला; ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांनी षडयंत्र केल्याचा आरोप

Google Layoffs 2026: AI वर वाढता खर्च; ५ देशांतील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याची ऑफर, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद; राजू शेट्टींचे आवाहन

Ethanol Car: १००% इथेनॉलवर धावणारी Toyota Innova Hycross लवकरच होणार लाँच; नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती!

SCROLL FOR NEXT