क्रीडा

"बुमराहच्या उगाच नादी लागलो असा विचार इंग्लंडही करत असेल"

विराज भागवत

भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाने व्यक्त केलं मत, वाचा आणखी काय म्हणाला...

Ind vs Eng Test: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध दमदार कामगिरी करत लॉर्ड्स कसोटी जिंकली. त्या कसोटीत लोकेश राहुलने शतक ठोकल्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. पण पाचव्या दिवशी सर्वाधिक चर्चा झाली ती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची. या दोघांनी आधी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर स्वत: गोलंदाजी करत असताना भेदक मारा करत यजमानांच्या फलंदाजांना पळता भुई थोडी केली. अँडरसन - बुमराह यांच्यातील बाऊन्सवरून झालेला वादविवाद आणि त्यानंतर बुमराह चिथवण्यासाठी त्याच्यावर केलेला बाऊन्सरचा मारा यामुळे इंग्लंडच्या हातून तो सामना निसटला अशी मतं अनेकांनी व्यक्त केली. याच मुद्द्यावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने मजेशीर मत व्यक्त केले.

जसप्रीत बुमराह चिडला आणि म्हणून त्याने अशा पद्धतीची धडाकेबाज कामगिरी केली असं असेल तर त्याने काही वेळा मुद्दाम समोरच्या संघाशी पंगा घेतला पाहिजे, असं मजेशीर मत जहीरने व्यक्त केलं. क्रिकबझशी बोलताना जहीर म्हणाला, "जर बुमराह चिडल्यानंतर अशाप्रकारे खेळ करू शकत असेल तर मला असं वाटतं की त्याने वरचे वर इतर संघांशी पंगा घ्यायला हवा. पहिल्या डावात बुमराहला एकही विकेट मिळाली नव्हती. इतका उत्तम गोलंदाज असूनही त्याला बळी मिळवता आला नाही. त्याची मनात खंत असणं स्वाभाविक होतं. त्यातच अँडरसनशी त्याचा वाद झाला. त्यानंतर तोच वाद बुमराहच्या फलंदाजीच्या वेळी उफाळून आला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी बुमराहला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण बुमराहने त्या रागाचा योग्य पद्धतीने वापर केला. या साऱ्या घडलेल्या प्रकारानंतर इंग्लंडला नक्कीच वाटत असेल की आपण उगाच बुमराहच्या नादी लागलो. आता पुढच्या वेळी त्याला हवे तेवढे बाऊन्सर टाकू दे. आपण त्याच्याशी पंगा घ्यायचा नाही!"

अँडरसन-बुमराहमध्ये काय झाला राडा?

बुमराहने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अँडरसनवर बाऊन्सरची बरसात केली. त्यामुळे अँडरसन चांगलाच खवळला. ते साऱ्यांनीच टीव्हीवरील लाईव्ह प्रक्षेपणात पाहिलं पण त्यानंतर नक्की काय घडलं? ते आर अश्विन आणि श्रीधर यांनी सांगितलं. बुमराहने अचानक अँडरसनवर वेगवान बाऊन्सरची बरसात सुरू केल्यानंतर अँडरसनने बुमराहला थेट सवाल केला की तू इतका वेगाने गोलंदाजी का करतो आहेस? तुला मी अशी गोलंदाजी केली होती का? त्यानंतर दिवसाचा खेळ संपल्यानंतर बुमराहने अँडरसनची माफी मागितली पण अँडरसन मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे बुमराह अधिकच खवळला आणि त्यातूनच पाचव्या दिवशी त्याने दमदार फलंदाजी व गोलंदाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT