England Vs Afghanistan ESAKAL
क्रीडा

ENG vs AFG : 6, 6, 6, 6... गुरबाज गरजला! गतविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी चांगलंच पळवलं

अनिरुद्ध संकपाळ

England Vs Afghanistan : वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये आज दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर गतविजेते इंग्लंड आणि झुंजार अफगाणिस्तानचा सामना होत आहे. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडने चेस करण्याचा निर्णय घेतला.

मात्र हा निर्णय अफगाणिस्तानच्या सलामीवीरांना यशस्वी होऊ दिला नाही. इंग्लंडच्या कसलेल्या गोलंदाजांच्या रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी ठिकऱ्या उडवल्या. या दोघांनी नाबाद शतकी सलामी देत इंग्लंडला चांगलाच धक्का दिला.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केलं. दिल्लीच्या पाटा खेळपट्टीवर लाईट्समध्ये चेस करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र हा निर्णय रहमानुल्ला गुरबाजने हाणून पाडला. त्याने आक्रमक फलंदाजी करत अफगाणिस्तानला 12 षटकात शंभरी पार करून दिली.

त्याला दुसरा सलामीवीर जादरानने सावध साथ देत विकेट टिकवून ठेवली. गुरबाजने जवळपास 150 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकल्या. त्याने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रहमनुल्ला गुरबाजने जादरानसोबत 114 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर इंग्लंडने जोरदार पुरनरागमन करत अफगाणिस्तानला धक्के देण्यास सुरूवात केली. आदिल रशीदने जादरानला 28 धावांवर बाद करत अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला.

त्यानंतर आलेला रहमत शाह 3 धावांची भर घालून परतला. त्याचीही रशीदनेच शिकार केली. पाठोपाठ 57 चेंडूत 80 धावा करणारा गुरबाज धावबाद झाला. यामुळे बिनबाद 114 धावांवरून अफगाणिस्तानची अवस्था 3 बाद 122 धावा अशी झाली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT