Virat Kohli ENG vs IND sakal
क्रीडा

ENG vs IND T20I : फॉर्मसाठी चाचपडणाऱ्या विराट कोहलीला शेवटी संधी

विराट कोहली आता खेळला नाही तर वर्ल्डकपचा दरवाजा होणार का बंद?

Kiran Mahanavar

India vs England 2nd T20 : आणि इंग्लंडमध्ये आज बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर दुसरा टी-20 सामना खेळल्या जाणार आहे. याच मैदानावर इंग्लंडने सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करून भारताचा कसोटीत पराभत केला होता. दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू जसप्रीत बुमराह, विराट कोहली, ऋषभ पंत संघात परतणार आहे. कोहली 5 महिन्यांनंतर टी-20 खेळताना दिसणार आहे. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो शेवटचा खेळताना दिसला होता.

कोहलीचा फॉर्म बऱ्याच काळापासून खराब चालू आहे, आणि त्यांच्या टी-20 कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत कोहली पुनरागमनासाठी खूप मेहनत घेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी त्याने नेटमध्ये सुमारे 1.30 तास फलंदाजीचा सराव केला. या सराव सत्राचा व्हिडिओ त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सराव सत्रादरम्यान प्रशिक्षक द्रविडने कोहलीशी बराच वेळ चर्चा केली. कोहली या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असेल का? इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 2 टी-20 सामन्यांमध्ये तो कशी कामगिरी करतो यावर ते अवलंबून आहे.

कोहलीच्या अनुपस्थितीत दीपक हुडा आणि श्रेयस अय्यर यांनी मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणे संघ व्यवस्थापनाला सोपे जाणार नाही. त्यामुळे कोहलीसाठी टी-20 संघात राहणे सोपे दिसत नाही. कोहलीने गेल्या 5 टी-20 सामन्यांमध्ये 2 अर्धशतके झळकावली आहेत. या कारणास्तव त्याची सरासरी आणि स्ट्राइक रेट टी-20 मध्येही कमी झाला आहे. आयपीएल 2022 मध्येही त्याची बॅट शांत राहिली होती. आरसीबीसाठी त्याने 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीने 341 धावा केल्या. केवळ टी-२० नाही तर वनडे आणि कसोटीतही त्याची सरासरी घसरली आहे. नोव्हेंबर 2019 पासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

मधल्या फळीत फलंदाजीसाठी भारताकडे बरेच पर्याय आहेत. अशा स्थितीत आता कोहलीला अधिक संधी मिळाल्याने याची शक्यता कमीच दिसत आहे. इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT