ENG vs NZ CWC 2023 esakal
क्रीडा

ENG vs NZ CWC 2023 : 4658 वनडे सामने झाले.. जे कधी झालं नाही ते आज इंग्लंडने करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

ENG vs NZ CWC 2023 : 13 वा आयसीसी वनडे वर्ल्डकप आजपासून भारतात सुरू झाला. पहिल्याच सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला उपविजेत्या न्यूझीलंडने चांगलेच अडचणीत आणले होते. मात्र तरी देखील पॉवर पॅक्ट इंग्लंडच्या बॅटिंग ऑर्डरने एक विश्वविक्रम करत 9 बाद 282 धावांपर्यंत मजल मारली. (ODI Cricket World Record)

जॉस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाने 4658 वनडे सामन्यांच्या इतिहासात बड्या बड्या संघांना जे जमलं नाही ते करून दाखवलं. आज इंग्लंडच्या सर्व 11 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. याचबरोबर अशी कामगिरी करणारा इंग्लंड हा वनडे इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.

विशेष म्हणजे कधी काळी फक्त कसोटी क्रिकेटमध्येच चांगली कामगिरी करणारा संघ असा शिक्का बसलेल्या इंग्लंडने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्यांनी नेदरलँडविरूद्ध गेल्या वर्षी 4 बाद 498 धावा ठोकल्या होत्या.

आजच्या न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 77 धावा केल्या. तर कर्णधार जॉस बटलरने 43 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना वेसन घातलं. मॅट हेन्रीने 3 तर सँटनर आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेत इंग्लंडला 300 धावांच्या आत रोखलं.

हेही वाचा : Mental health : आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर काय करावं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT