Babar Azam and Saqib Mahmood  Twitter
क्रीडा

ENG vs PAK : नवख्या गोलंदाजामोर बाबरने पुन्हा टेकले गुडघे! (VIDEO)

पहिल्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधाराला खातेही उघडता आले नव्हते

सुशांत जाधव

पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या बॅडपॅचचा सामना करताना दिसतोय. इंग्लंड विरुद्धच्या सलग दुसऱ्या वनडे सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. यावेळीही साकीब महमूदनेच त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या वनडेत महमदूने त्याला खातेही उघडू दिले नव्हते. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बॅट घालून बाबरला तंबूचा रस्ता धरावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 19 धावांवर असताना महमूदने त्याला चालते केले. (England vs Pakistan 2nd ODI Saqib Mahmood gets Babar Azam again Watch Video)

इंग्लंडच्या ताफ्यातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर इंग्लंडने पर्यायी संघ पाकिस्तान विरुद्ध उतरवण्याचा निर्णय घेतला होता. साकीब महमूदने वनडेच्या मोजके सामने खेळले आहेत. अल्प अनुभवाच्या जोरावर त्याने पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराला गुडघे टेकायला भाग पाडले. सध्याच्या घडीला बाबर आझम हा वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. त्यामुळेच बाबरची विकेट घेतल्यामुळे हा गोलंदाज चर्चेत आलाय.

लॉर्ड्सच्या मैदानात पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 47-47 षटकांचा करण्यात आला. बाबर आझमचा निर्णय पाकिस्तानी गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर फिलीप सॉल्ट 60 (54), जेम्स विन्स 56 (52) या दोघांच्या अर्धशतकानंतर तळाच्या फलंदाजीत लुईस ग्रेगरी 40 (47) आणि ब्रायडन कारसे यांनी 31 (41) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 45.2 षटकात कशाबशा 247 धावांपर्यंत मजल मारली.

डेविड मलान आणि झॅक क्राउले खातेही न उघडता माघारी फिरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्यालाही मैदानात फार काळ तग धरता आला नाही. हसन अलीने त्याला 22 धावांवर माघारी धाडले. त्याच्यासह हसन अलीने मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या. त्याला इतर गोलंदाजांनी सुरेख साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT