Euro Cup sakal
क्रीडा

Euro Cup: कोण मारणार फायनलमध्ये धडक? नेदरलँड्स की इंग्लंड? जगाचं लक्ष

Euro Cup Final: युरो करंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य लढतीत दोन्ही संघांना संधी

सकाळ वृत्तसेवा

Football Latest Marathi: युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी इंग्लंडचा संघ इच्छुक असून नेदरलँड्सला ३६ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणायची आहे. स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत बुधवारी रात्री होणार असून दोन्ही संघांना समान संधी असेल.

तीन वर्षांपूर्वी युरो करंडकाच्या अंतिम लढतीत इंग्लंडला पेनल्टी शूटआऊटवर इटलीने पराजित केले होते. गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आणखी एका अंतिम फेरीसाठी प्रयत्नशील आहे.

उपांत्यपूर्व लढतीत त्यांना स्वित्झर्लंडने झुंजविले. १-१ गोलबरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमधील गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड याच्या शानदार कामगिरीमुळे इंग्लंडने आगेकूच राखली. ‘‘सुरुवातीपासून आमचा संघ दबाव झेलत आलेला आहे. खेळाडू खरोखरच चांगली कामगिरी बजावत आहे,’’ असे आपल्या संघाचे कौतुक करताना इंग्लंडचे प्रशिक्षक साऊथगेट म्हणाले. इंग्लंडने स्पर्धेत जास्त गोल केलेले नाहीत, यासंदर्भात साऊथगेट यांनी नमूद केले की, ‘‘सध्या आम्ही चांगल्या प्रमाणात गोल नोंदवू शकलेलो नाही; पण आम्ही तीन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळलो, ज्यांचा बचाव खूपच सुनियोजित होता हे लक्षात घ्यायला हवे.’’

नेदरलँड्सने उपांत्यपूर्व लढतीत तुर्कस्तानला २-१ असे पराभूत करून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. डच संघाने १९८८ साली युरो करंडक पटकावला होता; पण नंतर त्यांना अंतिम फेरी गाठणे शक्य झालेले नाही. रोनाल्ड कुमन यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला इतिहास घडविण्याची संधी आहे. २० वर्षांनंतर त्यांनी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. २००४ साली अखेरच्या उपांत्य लढतीत डच संघाला पोर्तुगालने हरविले होते. ‘‘उपांत्य लढत जिंकण्यासाठी आम्हाला झुंजावे लागेल. ऐतिहासिकदृष्ट्या दोन प्रमुख राष्ट्रांत बुधवारी रात्री होणारी लढत फार मोठी असेल. इंग्लंडपाशी जसे चांगले खेळाडू आहेत, तसे आमच्यापाशीही आहेत,’’ असे सांगत डच प्रशिक्षक रोनाल्ड कुमन यांनी प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला.

हुकमी खेळाडूंकडून अपेक्षा

नेदरलँड्सने युरो करंडकातील वाटचालीत पाच लढतीत नऊ गोल नोंदविले आहेत. त्यांचा प्रमुख आघाडीपटू कॉडी गॅक्पो फॉर्ममध्ये असून त्याने तीन गोल केले आहेत. उपांत्य लढतीत तो इंग्लंडला त्रास देऊ शकतो. तुलनेत इंग्लंडच्या खात्यातील गोलसंख्या कमी आहे. त्यांनी पाच गोल नोंदविले आहेत. त्यापैकी चार गोल ज्युड बेलिंगहॅम व कर्णधार हॅरे केन (प्रत्येकी दोन) यांनी एकत्रित नोंदविले आहेत.

दृष्टिक्षेपात...

- एकमेकांविरुद्ध २२ लढतीत नेदरलँड्सचे सात, तर इंग्लंडचे सहा विजय, नऊ सामने बरोबरीत

- नेदरलँड्सचे स्पर्धेतील पाच लढतीत तीन विजय, एक बरोबरी, एक पराभव

- स्पर्धेतील पाच लढतीत इंग्लंडचे दोन विजय, तीन बरोबरी

- नेदरलँड्सचा उपांत्य फेरीतील अखेरचा विजय १९८८ साली पश्चिम जर्मनीविरुद्ध (२-१)

- यापूर्वीच्या पाच उपांत्य लढतीत नेदरलँड्सचा एक विजय, चार पराभव

- इंग्लंड यापूर्वी तीन वेळा उपांत्य फेरीत, एक विजय व दोन पराभव

- उभय संघांतील अखेरची लढत ६ जून २०१९ मध्ये नेशन्स लीगमध्ये, तेव्हा नेदरलँड्सची इंग्लंडवर ३-१ फरकाने मात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT