FIFA  Sakal
क्रीडा

FIFA Suspends AIFF : FIFA कडून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ निलंबित

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

FIFA Suspends AIFF : भारतीय फुटबॉल खेळाडू आणि चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉलने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले आहे. तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे फिफाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन मागे घेतले जाईल, असे फिफाने म्हटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजपासून (दि. 16 ऑगस्ट 2022) कोलकातामध्ये ड्युरंड चषक स्पर्धा सुरू होत आहे. यामध्ये बंगळुरू एफसीचा संघ जमशेदपूर एफसीशी भिडणार आहे. या स्पर्धेत 11 इंडियन सुपर लीग (ISL) क्लब सहभागी होणार आहेत.

ऑगस्टच्या सुरुवातीस फिफाने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबद्दल AIFF ला निलंबनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सर्वांच्या सहमतीनंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये FIFA कौन्सिलच्या ब्युरोने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावासाठी तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचे नमुद केले आहे.

यासोबतच फिफाने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचा हक्क काढून घेण्याची धमकीही दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफला निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने (CoA) निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून, 28 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

फिफाच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करा
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि अनुभवी स्ट्रायकर सुनील छेत्रीने रविवारीच आपल्या सहकारी खेळाडूंना सांगितले होते की, भारतीय फुटबॉल निलंबित किंवा बंदीच्या फिफाच्या धमक्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. तुम्ही मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या या आवाहनानंतर अवघ्या दोन दिवासातच फिफाकडून भारतीय फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

11 ऑक्टोबरपासून सुरू होणार होता अंडर17 महिला फुटबॉल विश्वकप

17 वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वचषक 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव होता. त्याच्या यशस्वी होस्टिंगसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तरदायित्व पत्रावर स्वाक्षरी करून आधीच मान्यता दिली होती. मात्र, आता फिफाच्या बंदीमुळे 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणारा आगामी FIFA U-17 महिला विश्वचषक पुढे ढकलला जाणार आहे.

स्पर्धेचे भवितव्य योग्य वेळी ठरवले जाईल आणि गरज भासल्यास हे प्रकरण ब्युरो ऑफ कौन्सिलकडे पाठवले जाईल, असे फिफाने म्हटले आहे. तसेच आता ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार भारतात होऊ शकणार नसल्याचेही फिफाने स्पष्ट केले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन मागे घेतले जाईल, असे फिफाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 25th Installment Date 2027 : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! पीएम किसान योजनेचा 25 वा हप्ता कधी मिळणार? 'या' महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता

IND vs NZ 2nd ODI Live : न्यूझीलंडने LIVE मॅचमध्ये टीम बदलली, फलंदाजीला दुसरा खेळाडू अन् आता गोलंदाजीला Matt Fisherला उतरवले, त्याने विकेट घेतली; नेमकी भानगड काय?

बीडीडी रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! मूळ मुंबईकरांना शहरातच घरे, चावीवाटप कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update: एकनाथ शिंदे जालन्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

'रामायण' मध्ये रावणाच्या भूमिकेला कुणी दिलाय आवाज? लोकप्रिय मराठी अभिनेत्याने केलीये यशच्या आवाजाशी बरोबरी

SCROLL FOR NEXT