FIFA World Cup 2022 Sakal
क्रीडा

France Riots FIFA World Cup : पराभवानंतर फ्रान्समध्ये राडा, चाहत्यांनी जाळल्या गाड्या, पोलिसांना...

पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला.

सकाळ डिजिटल टीम

अर्जेंटिनाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून फिफा विश्वचषक 2022 चे विजेतेपद पटकावले. पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 4-2 असा विजय मिळवला. अंतिम फेरीतील पराभवानंतर फ्रान्समधील चाहत्यांचा संयम सुटला असून देशाच्या विविध भागात दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अर्जेंटिनाच्या हातून झालेल्या पराभवानंतर पॅरिसमध्ये भीषण हिंसाचार झाला आणि चाहत्यांनी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

फिफा विश्वचषक फायनलसाठी फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. येथे मोठ्या पडद्यावर विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिला जात होता, दरम्यान सामन्याचे वातावरण तापले आणि फ्रान्स हरल्यानंतर चाहत्यां वाहनांची तोडफोड केली.

मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला पराभवाला सामोरे जावे लागताच परिस्थिती अनियंत्रित झाली आणि वेगवेगळ्या शहरांतून हिंसाचाराच्या बातम्या आल्या. पॅरिसशिवाय लायनमध्ये पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, इथेही चाहत्यांनी वाहने पेटवली होती.

फ्रान्सच्या वेगवेगळ्या शहरांमधून काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, ज्यात लोक गाड्यांची तोडफोड करताना आणि त्यांना आग लावताना दिसत आहेत. पॅरिसमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते, मात्र त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. कारण लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते आणि अंतिम फेरीतील पराभवानंतरच ते अनियंत्रित झाले होते.

फिफा विश्वचषक फायनमध्ये कतारमधील लुसेल स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. या सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमधून झाला. सामन्याची नियोजित वेळ संपली तेव्हा स्कोअर 3-3 होता, फ्रान्ससाठी या सामन्यात एमबाप्पेने हॅट्ट्रिक केली तर लिओनेल मेस्सीने दोन गोल केले. अर्जेंटिनाने हा विश्वचषक पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला आणि 36 वर्षांचा दुष्काळ संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT